Famous Misal Pune: 25 वर्षांपासून जपलाय चवीचा वारसा, पुण्यात प्रसिद्ध मिसळ, खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Famous Misal Pune: 1999 साली हातगाडीवरून सुरू झालेला हा व्यवसाय आज चक्क मिसळीच्या विविध चविष्ट प्रकारांसाठी ओळखला जातो. या ठिकाणी मिसळ खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी असते.
पुणे : चवीने पुणेकरांची मने जिंकणारी आणि खवय्यांची नेहमीच पसंती ठरणारी अप्पाची मिसळ गेली 25 वर्षे पुण्यातील नाना पेठ परिसरात तितक्याच चवीने आणि लोकप्रियतेने चालू आहे. 1999 साली हातगाडीवरून सुरू झालेला हा व्यवसाय आज चक्क मिसळीच्या विविध चविष्ट प्रकारांसाठी ओळखला जातो. या ठिकाणी मिसळ खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी असते.
सुरुवातीला केवळ एकाच प्रकारची मिसळ अवघ्या 8 रुपयांना मिळत होती. सध्या येथे साधी मिसळ, दही मिसळ, बटर मिसळ, चीझ मिसळ आणि तुपातील मिसळ असे पाच ते सहा प्रकार उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रकारात मिसळीचा अनोखा स्वाद जाणवतो. आज या मिसळीची किंमत 100 रुपयांपासून सुरू होते, पण खवय्यांसाठी ती अजूनही तितकीच लोकप्रिय आहे.
advertisement
या मिसळीचा खास आकर्षण म्हणजे घरगुती पद्धतीने बनवलेला मसाला, जो आरोग्यदृष्ट्या उत्तम असून चवीलाही तितकाच चांगला आहे. त्यामुळे ही मिसळ फक्त चवीलाच नव्हे, तर आरोग्यासाठीही उत्तम मानली जाते. व्यवसायाचे मालक संदीप चौधरी सांगतात की, गेल्या 25 वर्षांत अनेक चढउतार आले, पण ग्राहकांनी कायम आमच्यावर प्रेम केले. त्यांच्यामुळेच आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो.
advertisement
दररोज नाना पेठ परिसरात अप्पाची मिसळ खाण्यासाठी पुण्यातील आणि बाहेरून येणाऱ्या खवय्यांचीही मोठी गर्दी पाहायला मिळते. खास करून तरुणाईमध्ये बटर आणि चीझ मिसळची क्रेझ आहे. अप्पाची मिसळ म्हणजे केवळ एक खाद्यपदार्थ नव्हे, तर पुणेकरांच्या जिभेवरचा आणि आठवणीतला खास स्वाद बनला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 14, 2025 9:02 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Famous Misal Pune: 25 वर्षांपासून जपलाय चवीचा वारसा, पुण्यात प्रसिद्ध मिसळ, खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी