Malvani Food In Mumbai: 8 वर्षांची परंपरा, अस्सल मालवणी जेवणाची चव चाखावी तर मुंबईत इथंच, खवय्यांची असते गर्दी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
अस्सल मालवणी चव, घरगुती स्वाद आणि प्रेमाने भरलेली थाळी यामुळे हे हॉटेल आज हजारो खवय्यांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झालं आहे.
मुंबई: कोकणी पदार्थ खायला अनेकांना आवडतात. लोअर परळमधील स्वाद घरचा या हॉटेलने नुकतीच आपली 8 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली आहे. अस्सल मालवणी चव, घरगुती स्वाद आणि प्रेमाने भरलेली थाळी यामुळे हे हॉटेल आज हजारो खवय्यांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झालं आहे.
प्रेरणा सावंत या हॉटेलच्या मालकीण असून, त्यांनी 12 वर्षांचा मर्चंट नेव्हीचा व्यवसाय सोडून आपल्या बालपणीच्या स्वप्नासाठी हा प्रवास सुरू केला. त्यांच्या मनात एकच संकल्पना होती की मालवणी चव प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायची आणि त्या संकल्पनेतूनच स्वाद घरचा या हॉटेलचा जन्म झाला.
advertisement
हॉटेल सुरू झालं तेव्हा फक्त दोन कर्मचारी होते. आज 8 वर्षांनंतर 10-12 जणांची टीम त्यांच्यासोबत आहे. पण विशेष बाब म्हणजे आजही प्रेरणा सावंत स्वतः सर्व मसाले तयार करतात, प्रत्येक पदार्थात स्वतःची खास चव घालतात आणि मुख्य स्वयंपाक त्यांच्याच हातून होतो. त्यामुळेच भरलेलं पापलेट, कोंबडी-वडे थाळी, प्रॉन्स बिर्याणी, चिकन, मटण, मालवणी व्हेज थाळी हे पदार्थ आजही तितकेच प्रसिद्ध आहेत.
advertisement
हॉटेलमध्ये दररोज ग्राहकांची मोठी गर्दी असते आणि वेटिंग असूनही लोक इथल्या जेवणासाठी तासंतास थांबतात. हे यश सहजसोपं नव्हतं पण प्रेरणा सावंत यांना त्यांच्या पतीचा संपूर्ण पाठिंबा लाभला. त्या नम्रपणे म्हणतात की या प्रवासाचं संपूर्ण श्रेय माझ्या पतीला जातं. त्यांचा विश्वास आणि साथ नसती, तर हे शक्य झालं नसतं.
advertisement
आज स्वाद घरचा हे हॉटेल केवळ जेवणासाठीच नव्हे, तर मेहनत, स्वप्नपूर्ती आणि संस्कृती टिकवण्यासाठी उभं राहिलेलं एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 10, 2025 7:13 PM IST
मराठी बातम्या/Food/
Malvani Food In Mumbai: 8 वर्षांची परंपरा, अस्सल मालवणी जेवणाची चव चाखावी तर मुंबईत इथंच, खवय्यांची असते गर्दी