व्हेज मोमोजपासून ते चिकन पॉपकॉर्न, फक्त 100 रुपयांपासून फ्रोजन फूड, डोंबिवलीत हे आहे ठिकाण!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
अनेक स्नॅक्स सेंटर सुद्धा हे फ्रोजन फूड होलसेल रेटमध्ये विकत घेऊन हे विकतात. पण डोंबिवली ते कुठे चांगलं मिळतं याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
डोंबिवली : सध्या रेडी टू बाईट किंवा फ्रोजन फूड खूप ट्रेडिंगला आहेत. अनेक जण आवर्जून पार्टीसाठी, संध्याकाळी स्नॅक्ससाठी रेडी टू बाईट फूड घेतात. अनेक स्नॅक्स सेंटर सुद्धा हे फ्रोजन फूड होलसेल रेटमध्ये विकत घेऊन हे विकतात. पण डोंबिवली ते कुठे चांगलं मिळतं याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. डोंबिवली स्थानकापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणारे रेडी टू बाईट या दुकानात फक्त 100 रुपयांपासून सगळे फ्रोजन फूड सुरू होतात. यामध्ये अगदी मोमोजपासून फ्रेंच फ्राईजपर्यंत सगळं काही उपलब्ध आहे.
advertisement
रेडी टू बाईट या दुकानात तुम्हाला व्हेजमध्ये चीज बॉल, पोटॅटो चीज शॉट, चिली गार्लिक पोटॅटो शॉट, क्रिस्पी वेजी फिंगर, प्रीमियम वेजिडेकर, व्हेज मोमोज, ए सॉर्टेड व्हेज मोमोज, पनीर पेरी पेरी मोमोज, पनीर टिक्का मोमोज, चीज कॉर्न मामोज असं सगळं काही मिळेल. नॉनव्हेजमध्ये तुम्हाला इथे क्रंची चिकन पॉपवाईट, क्रिस्पी चिकन नगेट, चिकन क्रिस्पी, चिकन बॉल, चिकन साजेस, चिकन चीज बॉल, चिकन फ्राईज, चिकन मोमोज, मसाला मोमोज, चिकन पॉपकॉर्न असे सगळे पदार्थ उपलब्ध आहेत.
advertisement
विशेष म्हणजे इथे तुम्हाला पराठ्यामध्ये सुद्धा तीन प्रकार मिळतील. या फ्रोजन पराठामध्ये आलू पराठा, मलबार पराठा, पफ पराठा मिळतील. यांची किंमत इथे फक्त 120 रुपयांपासून सुरु होते. मायोनिजमध्ये सुद्धा इथे स्मोकी पेरी पेरी, इटालियन चीज ड्रेसिंग, प्लेन व्हेज, तंदुरी, चीजी डीप आणि शेजवान सॉस हे स्पेशल फ्रोजन फूड उपलब्ध आहे. याची किंमत सुद्धा फक्त 120 रुपयांपासून सुरू होते.
advertisement
'आमच्या इथे तुम्हाला 100 रुपयांपासून फ्रोजन फूड मिळेल. होलसेल फ्रोजन वाला म्हणून सुद्धा आमची ओळख आहे. हे फ्रोजन फूड तुम्हाला जर वर्षभर टिकवून ठेवायचा असेल तर डीप फ्रिजरमध्ये ठेवायचं' असं दुकानदार तेजस्विनी हिने सांगितले.
तुम्हाला जर होलसेल मध्ये इथे पदार्थ घेण्याची इच्छा असेल तर यामध्ये तुम्हाला अर्धा किलो पासून ते एक किलो पर्यंत सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
December 26, 2024 3:22 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
व्हेज मोमोजपासून ते चिकन पॉपकॉर्न, फक्त 100 रुपयांपासून फ्रोजन फूड, डोंबिवलीत हे आहे ठिकाण!