Diwali 2025 : घरासारखी चव आणि किंमतही कमी, दिवाळीचा फराळ ठाण्यात इथं सगळ्यात स्वस्त
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
दिवाळी म्हटली की आठवतो तो घराघरात साजरा होणारा आनंद, उत्सवाची लगबग, रोषणाईची सजावट आणि अर्थातच चविष्ट फराळ. पण आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत बऱ्याच जणांना स्वतः फराळ बनवण्यास वेळ मिळत नाही.
ठाणे : दिवाळी म्हटली की आठवतो तो घराघरात साजरा होणारा आनंद, उत्सवाची लगबग, रोषणाईची सजावट आणि अर्थातच चविष्ट फराळ. पण आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत बऱ्याच जणांना स्वतः फराळ बनवण्यास वेळ मिळत नाही. बाजारातील रेडिमेड फराळ हा पर्याय नक्कीच आहे, पण त्यात घरगुती चव आणि स्वच्छतेबाबत शंका असते. हीच गरज लक्षात घेऊन ‘समर्थ ड्रायफ्रूट्स, ठाणे’ यांनी खास घरगुती पद्धतीने बनवलेला दिवाळी फराळ यंदा उपलब्ध करून दिला आहे.
येथील लाडू, चकल्या, चिवडा, करंज्या, नानखटाई अशा पारंपरिक पदार्थांमध्ये घरगुती चव आणि शुद्धतेचा विश्वास असतो. बेसनाचे शुद्ध तूपातले लाडू केवळ 800 रुपये किलो, हाताने बनवलेल्या करंज्या 200 रुपये पाव किलो, तर नायलॉन, मका, कोथिंबीर आणि पापड अशा चार प्रकारचा चिवडा प्रत्येकी 120 रुपये पाव किलो दराने मिळतो. शिवाय, ज्वारी, बाजरी, मका आणि मुगाच्या चकल्यांसह विविध प्रकारच्या चविष्ट पदार्थांची चव येथे अनुभवता येते.
advertisement
फराळासोबतच येथे A1 दर्जेदार आणि ऑर्गेनिक ड्रायफ्रूट्सही सहज मिळतात. ग्राहकांच्या सोयीसाठी ‘समर्थ ड्रायफ्रूट्स’ फ्री होम डिलिव्हरीची सुविधा देखील पुरवते. विशेष म्हणजे कंपन्यांसाठी आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी दिवाळी कॉर्पोरेट गिफ्ट हॅम्पर्स सुद्धा येथे आकर्षक पद्धतीने कस्टमाइज करून दिले जातात. स्वच्छता, चव, दर्जा आणि विश्वास या सर्व गोष्टी आता एकाच ठिकाणी मिळणार आहेत, असे समर्थ ड्रायफ्रूट्सचे ओनर सांगतात.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
October 10, 2025 6:14 PM IST
मराठी बातम्या/Food/
Diwali 2025 : घरासारखी चव आणि किंमतही कमी, दिवाळीचा फराळ ठाण्यात इथं सगळ्यात स्वस्त