पेरू पौष्टिक की सफरचंद? तुमचंही उत्तर हमखास चूकणार!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Healthy fruits : दररोज 1 सफरचंद खाल्ल्यास आपण सुदृढ राहू शकता, असं आपण बऱ्याचदा ऐकलं असेल. पण तुम्हाला माहितीये का...
तनुज पांडे, प्रतिनिधी
नैनिताल : सध्याचं जग धावपळीचं असलं आणि स्वत:कडे लक्ष द्यायला कितीही वेळ नसला तरी अनेकजणांचा कल फिट राहण्याकडे असतो. दररोज 1 सफरचंद खाल्ल्यास आपण सुदृढ राहू शकतो, असं तुम्हीही बऱ्याचदा ऐकलं असेल. सफरचंद पौष्टिक असतं यात काही शंका नाही पण तुम्हाला माहितीये का, सफरचंदापेक्षाही एक फळ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतं. खुद्द डॉक्टर याबाबत माहिती देतात.
advertisement
पेरू भलेही चवीला सफरचंदाच्या तोडीस तोड नसेल, मात्र पोषक तत्त्व यात भरभरून असतात. व्हिटॅमिन सी आणि मिनरल्सने परिपूर्ण असलेलं पेरू अनेक आजारांपासून शरिराचं रक्षण करतं. यात व्हिटॅमिन सी भरपूर असतं, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती उत्तम होते. शिवाय व्हिटॅमिन ए आणि बीसुद्धा खूप असतं. उत्तराखंडमधील डॉक्टर ललित तिवारी सांगतात, पेरूमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे आपली त्वचा तजेलदार राहण्यास मदत मिळते, तसंच विविध आजारांपासूनही शरिराचं रक्षण होतं.
advertisement
डॉक्टर तिवारी सांगतात, पेरूमध्ये सफरचंदाच्या तुलनेत आयर्न 2.17, मॅग्नेशियम 4.4 आणि प्रोटीन 9.81 पटीने जास्त असतं. पेरूमुळे हाडं आणि पचनशक्ती भक्कम होते, शिवाय पेरूमध्ये फायबर सफरचंदापेक्षा 3.4 पटीने जास्त असल्यानं शरीर ऊर्जावान राहतं.
पेरू व्हिटॅमिनचा उत्तम स्त्रोत :
पेरूमध्ये C, B1, B2, B3, B5, B6 आणि E हे व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात. तसंच यातून कॅल्शियम, पोटॅशियम, कॉपर, झिंक, इत्यादी पोषक तत्त्वही मोठ्या प्रमाणात मिळतात. पेरू मधुमेहात आणि पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
Location :
Nainital,Uttarakhand
First Published :
August 16, 2024 7:53 PM IST