Wheat or Jowar: ज्वारीची भाकरी की गव्हाची चपाती? उत्तम आरोग्यासाठी काय खावं?

Last Updated:

Wheat or Jowar: सध्याच्या काळात आरोग्यासाठी अनेकजण आहाराबाबत काळजी घेताना दिसतात. ज्वारीची भाकरी खावी की गव्हाची चपाती असा प्रश्न अनेकांना पडतो.

+
Wheat

Wheat or Jowar: ज्वारीची भाकरी की गव्हाची चपाती? उत्तम आरोग्यासाठी काय खावं?

मुंबई: आपल्या रोजच्या आहारात पोळी किंवा भाकरी हे अनिवार्य घटक असतात. विशेषतः महाराष्ट्रीय जेवणात गव्हाची पोळी आणि ज्वारीची भाकरी यांना महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, सध्या आरोग्याची जागरूकता वाढल्यामुळे ‘गव्हाची चपाती (पोळी) की ज्वारीची भाकरी चांगली?’ हा प्रश्न अनेकांना पडत असतो. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
गव्हाची पोळी
गव्हाचे पीठ हे ग्लुटेनयुक्त असून त्यातून तयार होणारी पोळी सौम्य चव असते. यामध्ये कर्बोदकांची मात्रा जास्त असते आणि फायबरचे प्रमाण तुलनेने कमी असते. यामुळे ती दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देते. मात्र, याचा ग्लायसेमिक इंडेक्स तुलनेने जास्त असल्याने मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ही योग्य निवड ठरत नाही. गव्हामध्ये काही प्रमाणात प्रथिने आणि जीवनसत्त्वे असली तरी ती पचायला थोडी जड असते.
advertisement
ज्वारीची भाकरी
दुसरीकडे, ज्वारी ही एक पारंपरिक आणि अत्यंत पौष्टिक धान्य आहे. ज्वारीत फायबरचे प्रमाण अधिक असून ती पचनासाठी चांगली मानली जाते. याशिवाय, ती ग्लुटेनमुक्त असल्यामुळे ज्यांना ग्लुटेन इन्टॉलरन्स आहे त्यांच्यासाठी हे आदर्श अन्न आहे. ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असल्याने मधुमेहाच्या रुग्णांसाठी ती अधिक फायदेशीर आहे. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांसाठी ज्वारीचा आहारात समावेश करणे हे एक शहाणपणाचं पाऊल ठरू शकतं.
advertisement
आयुर्वेदिक आणि न्यूट्रिशन तज्ज्ञ सांगतात की, “गव्हाची पोळी ही काम करणाऱ्या व्यक्तीस तात्पुरती ऊर्जा देते, पण ज्वारी ही दीर्घकाळ फायदेशीर ठरते. विशेषतः लठ्ठपणा, मधुमेह, पचनाच्या तक्रारी असलेल्या लोकांनी गव्हाऐवजी ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा.” आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास ज्वारीची भाकरी ही गव्हाच्या पोळीपेक्षा अधिक पोषक आणि आरोग्यवर्धक आहे. विशेषत: शहरी जीवनशैलीत वाढलेला स्ट्रेस, कमी हालचाल, आणि मधुमेहाच्या वाढत्या समस्या लक्षात घेता ज्वारी हा अधिक सुरक्षित आणि उपयुक्त पर्याय मानला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Wheat or Jowar: ज्वारीची भाकरी की गव्हाची चपाती? उत्तम आरोग्यासाठी काय खावं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement