Kunjarachi Bhaji Recipe: मेथी, पालक खाणं विसराल, अशीही झटपट 5 मिनिटात बनणारी भाजी, VIDEO

Last Updated:

विवध औषधी गुणधर्म असणाऱ्या रानभाजीमधीलच एक म्हणजे कुंजराची भाजी. या भाजीचे सेवन केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

+
Kunjra

Kunjra Bhaji

अमरावती: पावसाळ्यामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या शेतात उगवतात. अंबाडी, चवळी, घोई आणि अशा बऱ्याच रानभाज्या पावसाळ्याच्या सिझनमध्ये बनवल्या जातात. या सर्व भाज्यांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असल्याने त्या अतिशय पौष्टिक असतात. त्यामुळे या रानभाज्या सर्वजण आवडीने खातात. यातीलच एक म्हणजे कुंजराची भाजी. या भाजीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच आणखी काही गुणधर्म सुद्धा या भाजीमध्ये आहेत. कुंजराची भाजी बनवण्यासाठी काही टिप्स आहेत. त्या पद्धतीने ही भाजी बनवली तर अतिशय चविष्ट आणि परफेक्ट अशी ही भाजी तयार होते.
कुंजराची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
 कुंजराची भाजी, कांदा (कांदे इतर भाजीपेक्षा जास्त घ्यावे लागतात), लाल मिरची, लसूण, जिरे, तेल, हळद आणि मीठ हे साहित्य लागेल
advertisement
कुंजराची भाजी बनवण्याची कृती
शेतातून आणलेली भाजी 1 ते 2 दिवस सुकवून घ्यायची आहे. त्यातील ओलसरपणा थोडा कमी झाला की, भाजी परफेक्ट तयार होते. तिला पाणी सुटत नाही. सुकल्यानंतर भाजी व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. त्यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आहे. कोरडी झाल्यानंतरच तिची भाजी करायला घ्यायची. भाजी कापून घेऊ नये.
advertisement
त्यानंतर भाजी बनवताना सर्वात आधी कढईत तेल टाकून घ्यायचे. तेल थोडे गरम झाले की, त्यात जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे व्यवस्थित तळतळले की त्यात मिरची टाकून घ्यायची आहे. त्यानंतर लसूण टाकून घ्या. लसूण 2 मिनिटे शिजवून घेतल्यानंतर त्यात कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे.
advertisement
कांदा लालसर झाल्यानंतर त्यात आता हळद आणि मीठ टाकून घ्या. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यात कुंजराची भाजी टाकून घ्यायची आहे. भाजी त्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स करून झाल्यानंतर 5 मिनिटे ही भाजी शिजवून घ्यायची आहे.
5 मिनिटांनंतर भाजी तयार झाली असेल. ही भाजी खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागते. त्याबरोबर पौष्टिकही आहे. तुम्ही नक्की बनवून बघा पौष्टिक आणि टेस्टी अशी कुंजराची भाजी
view comments
मराठी बातम्या/Food/
Kunjarachi Bhaji Recipe: मेथी, पालक खाणं विसराल, अशीही झटपट 5 मिनिटात बनणारी भाजी, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement