Mumbai Food: मुंबईत 153 महिला चालवतात खास फूड हब, कोळी मसाल्यातलं सी फूड खायचं तर थेट इथं जायचं, Video

Last Updated:

Mumbai Food: मुंबईतील 153 महिलांनी एकत्र येत अस्सल कोळी पद्धतीचं सी फूड हब सुरू केलं आहे. या ठिकाणी सर्व प्रकारचे मासे खवय्यांसाठी उपलब्ध आहेत.  

+
Mumbai

Mumbai Food: मुंबईत 153 महिला चालवतात खास फूड हब, कोळी मसाल्यातलं सी फूड खायचं तर थेट इथं जायचं, Video

नमिता सूर्यवंशी, प्रतिनिधी
मुंबई: मुंबईतील माहीम कोळीवाड्यात दोन वर्षांपूर्वी सुरू झालेला 'सी फूड प्लाझा' उपक्रम आता देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. कोळी महिलांना स्थानिक स्तरावर रोजगार मिळावा, या उद्देशाने 2023 साली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने आणि तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून एक खास उपक्रम सुरू झाला. आता या उपक्रमाने यशाचे नवे शिखर गाठले आहे. या उपक्रमातील 153 महिलांना अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि FSSAI कडून अन्नसुरक्षा व स्वच्छतेचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
advertisement
माहीम रेतीबंदरावर सुरू असलेल्या या सी फूड प्लाझामध्ये सध्या 13 महिला बचत गट कार्यरत आहेत. त्यांनी गेल्या दोन वर्षांत स्वच्छता, दर्जा आणि ग्राहक सेवा या बाबतीत सातत्य राखून हा उपक्रम केवळ स्थानिकांचाच नाही, तर पर्यटकांचाही आवडता अन्नगृह बनवला आहे. महिलांच्या हक्काच्या या व्यवसायाने त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं असून, कोळीवाड्यांमधील घराच्या उंबरठ्यावरच रोजगार निर्माण करण्याची मोठी संधी मिळाली आहे.
advertisement
महिलांनी चालवलेला पहिलाच फूड हब
या सी फूड प्लाझाला अन्न व औषध प्रशासन आणि महानगरपालिकेच्या वतीने 'ईट राईट स्ट्रीट फूड हब' म्हणून घोषित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, भारतातील महिलांनी संपूर्णपणे चालवलेला हा पहिलाच स्ट्रीट फूड हब ठरला आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी या महिलांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं. यात अन्न साठवणूक, स्वच्छता, योग्य साहित्याची निवड, तसेच ग्राहकांशी व्यवहार करताना घ्यायची काळजी यावर भर देण्यात आला.
advertisement
BMC चं नियोजन
या प्रकल्पासाठी BMC ने आवश्यक दालन, फर्निचर, कचरा व्यवस्थापनासाठी डबे, तसेच महिलांना अॅप्रन, हातमोजे आणि डोक्यावर घालण्याची टोप्या यांसारखी मूलभूत साधने पुरवली आहेत. प्रत्येक गटाने स्वतःचा माहिती फलक लावलेला असून, ग्राहकांना उत्तम आणि दर्जेदार अन्न देण्याची जबाबदारी प्रत्येक गट पार पाडत आहे.
आठवड्यातून 4 दिवस सुरू
सी फूड प्लाझा सध्या दर बुधवारी, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सुरू असतो. गेल्या काही महिन्यांत येथे देशविदेशातील पर्यटक येऊन स्थानिक कोळी महिलांच्या हातचं अस्सल सागरी खाद्यपदार्थ चाखत आहेत. अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि महिलांचा आत्मविश्वास यांचा उत्तम संगम या ठिकाणी पाहायला मिळतो.
advertisement
महिला सक्षमीकरणाचा आदर्श
FSSAI प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात राज्याचे अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, FDA आयुक्त राजेश नार्वेकर (IAS), सहआयुक्त मंगेश माने, सहायक आयुक्त अनुपमा पाटील आणि BMC अधिकारी उपस्थित होते. मंत्री कदम यांनी महिलांच्या योगदानाचं कौतुक करत या उपक्रमास “महिलांच्या सक्षमीकरणाचा आदर्श” ठरवले. हा उपक्रम केवळ रोजगारपुरता मर्यादित नसून, अन्नसुरक्षेच्या जनजागृतीसाठी आणि महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे.
मराठी बातम्या/Food/
Mumbai Food: मुंबईत 153 महिला चालवतात खास फूड हब, कोळी मसाल्यातलं सी फूड खायचं तर थेट इथं जायचं, Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement