पतीची साथ अन् जाऊबाई जोरात! नोकरी करून चालवतात फूड स्टॉल, खवय्यांच्या लागतात रांगा, Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
जालना येथे दोघी जावा पार्ट टाईम फूड स्टॉल चालवतात. त्यांच्या स्टॉलवर सँडविच खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी होते.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना: सध्याच्या काळात प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. त्यात पतीची साथ लाभल्यास महिला कोणतंही यश मिळवू शकतात. जालना शहरातील रुपाली आणि अंकिता गोयल या जाऊबाईंनी हेच दाखवून दिलंय. नोकरी करत अंकिता गोयल यांनी सँडविचचा स्टॉल सुरू केला. त्याला पतीची साथ आणि जाऊबाई रुपाली गोयल यांचा मदतीचा हात मिळाला. त्यामुळे रात्री पार्टटाईममध्ये सुरू असणाऱ्या त्यांच्या सँडविच स्टॉलवर खवय्यांच्या रांगा लागतात.
advertisement
कसा सुरू केला व्यवसाय?
अंकिता गोयल या मूळच्या गुजराती आहेत. 12 वर्षांपूर्वी त्यांचा विवाह प्रशांत गोयल यांच्याशी जालन्यात झाला आणि त्या महाराष्ट्रात आल्या. सुरुवातीपासूनच त्यांच्या डोक्यात काहीतरी नवीन करण्याची योजना होती. एकदा गुजरातला फिरायला गेल्यानंतर त्यांनी तिथे असाच सँडविच स्टॉल पाहिला आणि त्यांना असंच काहीतरी करण्याची कल्पना सुचली. घरी पतीशी सल्लामसलत केल्यानंतर त्यांनी घरीच सँडविच बनवून घरपोच विक्री करण्यास सुरुवात केली.
advertisement
आणि सँडविच स्टॉल सुरू केला
ग्राहकांना सँडविचची चव आवडू लागल्यानंतर त्यांनी व्यावसायिक पद्धतीने हा स्टॉल सुरू करण्याचा निर्णय घेतला. जालना शहरातील जिजामाता चौकात सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत 'राधे राधे सँडविच स्टॉल' सुरू असतो. या कामात त्यांना देवराणी रूपाली गोयल आणि पती प्रशांत गोयल यांची मोठी मदत होते. विशेष म्हणजे तिघेही नोकरी व्यवसाय करून पार्टटाईम मध्ये हा व्यवसाय करतात. 50 रुपयांपासून ते दीडशे रुपयांपर्यंतचे वेगवेगळे सँडविचचे प्रकार या स्टॉलवर उपलब्ध आहेत. या कामातून अंकिता यांना दिवसाला अडीच ते तीन हजारांचा व्यवसाय होतो, असे त्या सांगतात
advertisement
काय म्हणतात अंकिता...
"मी सध्या जालना एज्युकेशन फाउंडेशन इथे असलेल्या सायन्स लॅबमध्ये नोकरी करते. नोकरी करत काहीतरी बिजनेस करावा म्हणून आम्ही हा बिजनेस सुरू केला. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून हळूहळू हा व्यवसाय वाढवत नेणार आहोत. प्रत्येक स्त्रीने स्वतःला कमी न समजता स्वतःचे उत्पन्नाचे साधन निर्माण करून स्वतःच्या पायावर उभे राहिलंच पाहिजे, असं अंकिता गोयल सांगतात.
advertisement
मी फक्त मदत करतो..
view comments"माझ्या पत्नीने मला नवीन बिजनेस करण्याविषयी कळवलं. पत्नीच्या प्रत्येक निर्णयात पाठिंबा देण्याचं काम प्रत्येक पुरुषाने केलंच पाहिजे. तोच धर्म मी निभावला आणि त्या करत असलेल्या कामाला पाठिंबा दिला. सध्या देखील सगळं काही काम अंकिताच करते. मी फक्त त्यांना मदत करण्यासाठी सात वाजता येतो, असं प्रशांत गोयल यांनी सांगितलं.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
May 19, 2024 11:55 AM IST
मराठी बातम्या/Food/
पतीची साथ अन् जाऊबाई जोरात! नोकरी करून चालवतात फूड स्टॉल, खवय्यांच्या लागतात रांगा, Video

