नाशिककरांचं आवडतं स्ट्रीट फूड, या पदार्थासोबत समोसा कधी ट्राय केलाय का?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
आपण चटणीसोबत समोसा ट्राय केला असेल. पण नाशिकमध्ये खास समोसा मिळत असून त्याला खवय्यांची चांगलीच पसंती आहे.
नाशिक, 24 सप्टेंबर: बटाटा समोसा अगदी बटाटा वड्या प्रमाणे स्ट्रीट फूड मध्ये लोकप्रिय आहे. तुम्ही आजवर अनेकदा सिंगल समोसा खाल्ला असेल. समोसा बरोबर लाल चटणी लावून पाव देखील खाल्ला असेल. पण कधी ताकापासून तयार केलेल्या कढीसोबत समोसा खाल्लाय का? नाशिकमधील माऊली कढी समोसा या ठिकाणी कढीसोबत समोसा खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी असते.
नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात असलेले माऊली कढी समोसा हे ठिकाण त्याच्या युनिकनेसमुळे शहरात प्रसिद्ध आहे. लॉकडाऊन नंतर हा कढी समोसा रुपेश गायकवाड यांनी या ठिकाणी विकण्यास सुरू केला. तसेच साधारण समोसा किंवा समोसा पाव तर सगळेच विकतात. पण माऊली कढी समोसाचे मालक रुपेश गायकवाड यांनी हा समोसा ताकापासून तयार केलेल्या कढी सोबत खवय्यांना सर्व्ह करण्यास सुरू केले. अगदी नाशिककरांना देखील या समोशाचा मोह आवरला नाही. त्यामुळे कढी समोशाला मागणी वाढत गेली. हा युनिक फूड आयटम खाण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
advertisement
कढी समोशाचे वैशिष्ट्य
तसेच समोसा हा वडापाप्रमाणे स्ट्रीटफूड मध्ये लोकप्रिय आहे. अनेक ठिकाणी सिंगल समोसा व समोसा पाव हा चिंचेची चटणी व खोबऱ्याची चटणी सोबत सर्व्ह केला जातो. परंतु माऊली कढी समोसा या ठिकाणी मिळणारा समोसा हा ताकापासून तयार केलेल्या कढीसोबत सर्व्ह केला जातो. या युनिक फूड आयटम फक्त 20 रुपयात या ठिकाणी मिळतो. किंमत अगदी पॉकेट फ्रेंडली असल्यामुळे प्रत्येक वयोगटातील खवय्ये या ठिकाणी येऊन कडी समोशाचा आस्वाद घेतात.
advertisement
दिवसाला 3 हजार समोशांची विक्री
या कढी समोशाला फक्त नाशिक शहरातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात मागणी आहे. सुरुवातीला या ठिकाणी दिवसात 100 समोसे सर्व्ह होत होते. कालांतराने नाशिककरांनी कढी समोस्याला आपल्या सकाळच्या आहारात खाण्यास पसंती दर्शवली. त्यामुळे आज या ठिकाणी दिवसाला दोन ते तीन हजार समोसे अनलिमिटेड कढी सोबत सर्व्ह होतात, अशी माहिती माऊली कढी समोसाचे मालक रुपेश गायकवाड यांनी दिली आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
September 24, 2023 11:13 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
नाशिककरांचं आवडतं स्ट्रीट फूड, या पदार्थासोबत समोसा कधी ट्राय केलाय का?