Kids Tiffin Recipe : मुलांच्या डब्यासाठी बनवा टेस्टी आणि क्रिस्पी पोटॅटो मटर रोल! झटपट तयार होईल, पाहा रेसिपी
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Kids Tiffin Box Recipe In Marathi : आपल्याला मुलांनी डबा खावा यासाठी काही ना काही विशेष करावाच लागतं. तुमच्या याचा समस्येचा एक टेस्टी उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला एक अशी भन्नाट रेसिपी सांगत आहोत. जी अगदी झटपट बनेल आणि मुलंही आवडीने खातील.
मुंबई : मुलांच्या डब्याचा मोठा प्रश्न रोज आपल्यासमोर असतो. त्यात मुलांच्या आवडीनिवडी सतत बदलतात. आपल्याकडे प्रत्येकवेळी एवढा वेळ असेलच असे नाही. मात्र तरीही आपल्याला मुलांनी डबा खावा यासाठी काही ना काही विशेष करावाच लागतं. तुमच्या याचा समस्येचा एक टेस्टी उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आज आम्ही तुम्हाला एक अशी भन्नाट रेसिपी सांगत आहोत. जी अगदी झटपट बनेल आणि मुलंही आवडीने खातील. ही रेसिपी crispybitesindia या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली गेली आहे. चला पाहूया ही सोपी आणि चविष्ट रेसिपी कशी बनवायची.
क्रिस्पी पोटॅटो मटर रोलसाठी लागणारं साहित्य..
- उकडलेले बटाटे
- मटार
- कांदा
- हळद
advertisement
- लाल तिखट
- धणेपूड
- मीठ
- कोथिंबीर
क्रिस्पी पोटॅटो मटर रोल बनवण्याची सोपी पद्धत..
- सर्वात आधी एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे घ्या.
- त्यामध्ये मटार, कांदा, हळद, धणेपूड, लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर टाका.
- हे सर्व मॅश करून त्याचे एक सारण तयारीत करा.
- आता दुसरीकडे हे सारण भरण्यासाठी मैद्याची कणिक तयार करा.
advertisement
- त्यासाठी मैदा, मीठ आणि तेलाचे मोहन घाला.
- हवे आल्यास तुम्ही यामध्ये ओवादेखील टाकू शकता. आता पाणी टाकून कणिक तयार करा.
- त्यानंतर या कणकेचे गोळे काढा आणि चपातीप्रमाणे लाटून घ्या.
- आता या लाटलेल्या मैद्याच्या चपाती सरळ रेषेत कापून चार भाग करा.
- आता बटाट्याच्या सारणाचे अंडाकृती गोळे तयार करा आणि ते या चपातीच्या पट्ट्यांवर ठेवा,
advertisement
- नंतर याला रोल करा. सर्व रोल्स अशाप्रकारे बनवून घ्या.
- आता एक कढईमधे तेल घ्या. त्यामध्ये हे रोल्स सोडा.
- हलका सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत तळून घ्या.
advertisement
अशाप्रकारे तुमचे टेस्टी आणि क्रिस्पी पोटॅटो मटर रोल बनून तयार होतात. हे बनवण्यासाठी तुम्हाला जास्त वेळी लागत नाही आणि ही रेसिपी मुलांना खूपच आवडेल. तर एकदा नक्की ट्राय करून पाहा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 05, 2026 3:49 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Kids Tiffin Recipe : मुलांच्या डब्यासाठी बनवा टेस्टी आणि क्रिस्पी पोटॅटो मटर रोल! झटपट तयार होईल, पाहा रेसिपी









