Success Story: बापाचं स्वप्न लेकाने पूर्ण केलं, बंद पडलेला व्यवसाय सुरू केला, आता कमाई लाखात! Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
अनेक तरूण सध्याचा घडीला व्यवसाकडे वळत आहेत. 28 वर्षांच्या अथर्व चित्ते या तरुणाने कोरोना काळात बंद झालेले वडिलांचे सेंटर पुन्हा नव्याने सुरू करून नाशिकमधील ब्रँड बनवला आहे.
नाशिक: अनेक तरूण सध्याचा घडीला व्यवसाकडे वळत आहेत. 28 वर्षांच्या अथर्व चित्ते या तरुणाने कोरोना काळात बंद झालेले वडिलांचे पराठा सेंटर पुन्हा नव्याने सुरू करून नाशिकमधील पराठ्यांचा मोठा ब्रँड बनवला आहे. या माध्यमातून आता महिन्याला एक ते दीड लाखांचे उत्पन्न घेत आहे.
अथर्व याच्या वडिलांचा सुरुवातीपासून व्यवसाय आहे. सुरुवातीला अथर्व यांच्या आई-वडिलांची घरगुती मेस होती. चांगले पदार्थ आणि चव हाताला असल्याने त्यांनी बाहेर काही तरी विकावे या करता पराठा सेंटर सुरू केले. सुरुवातीला अथर्व यांचे आई-वडील रोडच्या बाजूला एका छोट्या दुकानावर पराठे बनवून विक्री करत असतं. त्या वेळेस त्यांना देखील अनेक अडचणींना समोर जावे लागले. कोरोना काळ येण्यापूर्वी त्यांच्या या व्यवसायाने चांगलीच वाढ घेतली होती. व्यवसाय सुरळीत सुरू असल्याने त्यांनी एक छोटी गाडी देखील घेतली. परंतु अचानक कोरोनाच्या संकटामुळे त्यांचा व्यवसाय बंद करावा लागला, असे अथर्व याने लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
त्यानंतर कोरोना महामारी संपल्याने पुन्हा जोराने उभे राहावे या करता अथर्व याच्या वडिलांनी अथर्वला सांगितले की आता तुला आपला व्यवसाय सांभाळावा लागेल. त्या वेळी अथर्व हा 12 वी कॉमर्सला होता. शिक्षण सुरू असताना अथर्व याने त्यांचा हा व्यवसाय हातात घेतला. त्यानंतर प्रगती होता होता आज त्याचा नाशिकमधील सर्वात मोठा ब्रँड हा निर्माण झाला आहे. आज या व्यवसायातून महिन्याला लाखोंचे उत्पन्न घेत आहे. तसेच यांच्याकडे 30 हून अधिक प्रकारचे पराठे हे मिळत असतात. तसेच 80 रुपयांपासून यांच्याकडे हे पराठे मिळत असतात.
advertisement
तुम्हाला जर यांच्याकडचा पराठा हा टेस्ट करावयाचा असल्यास नाशिकमधील भिसे चौक गंगापूर रोड येथील रामदास रघुवरी पराठ्याला नक्की भेट द्या.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
June 25, 2025 6:54 PM IST
मराठी बातम्या/Food/
Success Story: बापाचं स्वप्न लेकाने पूर्ण केलं, बंद पडलेला व्यवसाय सुरू केला, आता कमाई लाखात! Video

