कशी आहे नाशिकमधली जगप्रसिद्ध चुलीवरची मिसळ? निसर्गरम्य वातावरणात खाण्याची लज्जतच न्यारी

Last Updated:

गेल्या 64 वर्षांपासून नाशिकच्या या चुलीवरच्या मिसळीनं आपला ब्रँड जपलाय.

+
News18

News18

नाशिक, 28 सप्टेंबर : महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागाची वेगळी खाद्य संस्कृती आहे. मंदिरांचं शहर असलेल्या नाशिकमधला फेमस पदार्थ कोणता? असा प्रश्न विचारला तर सर्वजण मिसळ हेच उत्तर देतील. नाशिकमधल्या वेगवेगळ्या भागात एकापेक्षा एक सरस मिसळ मिळतात. त्यामुळेच नाशकात कुठूनही पर्यटक आले तर ते मिसळ खाल्ल्याशिवाय परतत नाहीत.
नाशिक शहरातल्या मिसळीला 150 वर्षांची परंपरा आहे, असं अभ्यासक सांगतात. पूर्वी चुलीवरची मिसळ चांगली प्रसिद्ध होती. नंतर कोळशावरची मिसळ आली. पुढे डिझेलच्या भट्ट्यांवर मिसळ बनवली जायची. त्यानंतर गॅस आले आणि त्यावर मिसळ बनवायला लागले. आता पुन्हा एकदा जिथून सुरुवात झाली होती त्याच चुलीवरच्या मिसळला खवय्यांची मागणी वाढली आहे. तो एक ब्रँड तयार झालाय. नाशिकमधली चुलीवरच्या सर्वात फेमस मिसळीची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
advertisement
नाशिक शहरातील बारदान फाटा परिसरात असलेले साधना चुलीवरची मिसळ ही नाशिक शहरातच नव्हे तर पूर्ण देशात प्रसिद्ध आहे. श्रीराम आमले यांनी 1959 साली ही मिसळ सुरू केली. आज  मंगेश आणि राजन आमले हा व्यवसाय सांभळतात. विशेष म्हणजे गेल्या 64 वर्षांपासून इथं चुलीवरची मिसळ मिळते.
advertisement
ही मिसळ बनवण्यासाठी आमले कुटुंबीयांची खास रेसीपी आहे. मिसळमध्ये मटकी आणि गावठी माठ वापरले जातात. त्यात पडणारे सर्व प्रकारचे मसाले हे आमले कुटुंबीयांचे इनहाऊस मसाले आहेत. त्याचबरोबर मिसळीच्या वर सर्व्ह करण्यात येणारी शेव देखील ते स्वतःच तयार करतात.
advertisement
या ठिकाणी बसण्याची व्यवस्था देखील जुन्या पद्धतीची आहे. दोन जम्बो पावसोबत ही मिसळ सर्व्ह केली जाते.  ही दोन  त्याचबरोबर अनलिमिटेड ग्रेव्ही आणि तर्री देखील मिळते. या चविष्ट मिसळपाव बरोबर दहीची एक लहान वाटी एक मोठा पापड दिला जातो
advertisement
श्रीराम आमले यांची दोन मुले मंगेश आमले राजन आमले हा पूर्ण व्यवसाय सांभाळत आहेत. वडिलोपार्जित रेसिपी ते आजही या ठिकाणी जोपासत आहेत. तुम्हाला तुमच्या परिवारासोबत थोडा क्वालिटी टाइम स्पेंड करायचा असेल, तर विकेंड डे आउट साठी साधना चुलीवरची मिसळ हा एक उत्तम पर्याय आहे.
advertisement
सुट्टीच्या दिवशी या मिसळचा आस्वाद घेण्यासाठी आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्यासाठी साधना मिसळ एक उत्तम पर्याय आहे. मिसळ बरोबरच मनोरंजनाचे विविध साधन या ठिकाणी विकेंडला सुरू असतात, अशी माहिती साधना मिसळचे मालक मंगेश आमले यांनी दिली. 
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
कशी आहे नाशिकमधली जगप्रसिद्ध चुलीवरची मिसळ? निसर्गरम्य वातावरणात खाण्याची लज्जतच न्यारी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement