मुंबईत याठिकाणी मिळते वेगवेगळ्या फ्लेवरची चटपटीत पाणीपुरी, किंमतही कमीच, हे आहे लोकेशन
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Priyanka Jagtap
Last Updated:
पाणीपुरीने केवळ मनच नाही तर पोटदेखील भरते. त्यामुळेच पाणीपुरीच्या स्टॉलसमोर आपल्याला नेहमीच गर्दी पाहायला मिळते. पाणीपुरी हे एक प्रचंड लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे.
प्रियंका जगताप, प्रतिनिधी
मुंबई : पाणीपुरीचे नाव काढले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. हे असे एक स्ट्रीट फूड आहे की, कोणीही कधीही खावू शकते. पाणीपुरीने केवळ मनच नाही तर पोटदेखील भरते. त्यामुळेच पाणीपुरीच्या स्टॉलसमोर आपल्याला नेहमीच गर्दी पाहायला मिळते. पाणीपुरी हे एक प्रचंड लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. त्यामुळे ते मोठमोठ्या रेस्टॉरंट्सपासून ते रस्त्यावरील विक्रेत्यांपर्यंत, गजबजलेल्या बाजारपेठांपासून ते समुद्रकिनाऱ्यांपर्यंत विविध स्टॉल्सवर आढळते.
advertisement
आपण चाटबद्दल बोललो तर प्रत्येकाला आवडते आणि आठवते ती पाणीपुरी. मुंबईतील जे बी नगर या स्ट्रीट स्टॉल फूडमध्ये कुरकुरीत पुरी पाहायला मिळतात. या पुरींसोबत ते वेगवेगळया फ्लेवरच्या पाण्यासोबत, जसे की, काही बुंदीसह, काही स्प्राउट्ससह, काही तिखट चटणीसह मसालेदार आणि इतर पुदिन्याने भरलेल्या पाण्यानेही पाणीपुरीची डिश याठिकाणी मिळते. तेही फक्त 25 रुपयांपासून याठिकाणी विविध प्रकारच्या पाणीपुरीची चव चाखायला मिळते. याचा आस्वाद घेण्यासाठी सर्व स्ट्रीट चाट फूडप्रेमी इथे येत असतात. या फूड स्टॉलचा लोकल18 च्या टीमने एक विशेष आढावा घेतला.
advertisement
वधू पाहत होती वाट, पण वऱ्हाड्यांवर काळाचा घाला, 6 जणांचा जागीच मृत्यू, हादरवणारी घटना
नियमित पाणीपुरी ही एक क्लासिक चव आहे जी सर्वांना आवडते. जीरा पाणीपुरीला एक छान चव असते. लसणाची पाणीपूरी पाणीपुरी खूप तिखट असते आणि ती हृदयाने कमकुवत लोकांसाठी नक्कीच नाही. पुदीना पाणीपुरी लसणीच्या फोडणीनंतर तयार होते. पुदीना पाणीपुरी खास लसूण फोडणी देऊन तयार केली जाते. ही पाणीपुरी खाल्ल्यावर खूप थंड आणि ताजेतवाने वाटते. हजमा हजम पाणीपुरीचा अर्थ पचनास मदत करण्यासाठी आहे आणि मसाला पुरी हा मसाल्यांच्या मिश्रणासह तुमची थाळी पूर्ण करण्याचा उत्तम मार्ग आहे.
advertisement
येथील रेसिपी सहसा मसालेदार असते आणि त्यात 'बूंदी' असते. पाणीपुरी खाण्याचे देखील फायदे आहेत. पाणीपुरीच्या पाण्यामध्ये असलेली पुदीन्याची चटणी, कोथिंबीर, हिरवी मिर्ची, जिरे, हिंग आणि काळे मीठ तुमची पचनक्रिया व्यवस्थित करते. त्यामुळेच पाणीपुरी खाल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 03, 2024 12:00 PM IST
मराठी बातम्या/Food/
मुंबईत याठिकाणी मिळते वेगवेगळ्या फ्लेवरची चटपटीत पाणीपुरी, किंमतही कमीच, हे आहे लोकेशन