Best Food In Pune: कोथरूडमध्ये चविष्ट जेवण शोधताय? 'हे' ठिकाण ठरू शकतं उत्तम पर्याय
- Reported by:Niranjan Sherkar
- Published by:
Last Updated:
आपले घर सोडून पुण्यात राहणारी प्रत्येक व्यक्ती चांगले जेवण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असते. पुण्यातील कोथरूडमध्ये वैष्णवी फूड सेंटर अनेक वर्षांपासून नागरिकांना कमी दरात उत्तम जेवणाची सुविधा देत आहे.
पुणे: शिक्षणाचे माहेरघर आणि औद्योगिक नगरी अशी, पुणे शहराची ओळख आहे. या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि बाहेरील राज्यातून अनेकजण येतात. काहीजण शिक्षण घेण्यासाठी येतात तर काहीजण नोकरीनिमित्त येतात. घरापासून दूर राहण्यासाठी आल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न हा जेवणाचा असतो. असा प्रश्न पडणाऱ्या व्यक्तींसाठी पुण्यातील कोथरूडमध्ये एक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.
कोथरूडमध्ये राहणाऱ्या अस्मिता थोरात आणि कृष्णा थोरात यांनी घरातच सुरू केलेल्या छोट्या मेसच्या व्यवसायाचं मोठ्या फूड सेंटरमध्ये रूपांतर झालं आहे. या फुड सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना चविष्ट आणि अतिशय हायजेनिक जेवण दिले जाते. लोकल 18 शी सोबत बोलताना आकाश थोरात यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
सरकारी नोकरी करणारे कृष्णा थोरात आणि गृहिणी असणाऱ्या अस्मिता थोरात यांनी समाजसेवेचा दृष्टिकोन समोर ठेवून 2008 मध्ये घरातूनच छोट्या स्वरूपाचा मेस व्ययसाय सुरू केला होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी 70 ते 80 डबे पुरवत होते. कोथरूड परिसरात असणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कृष्णा थोरात यांनी जेवणाचे डब्बे पोहोचवण्याचे काम हाती घेतले होते. उत्तम चव, स्वच्छता आणि आपुलकीच्या बळावर थोरात दांपत्याच्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली.
advertisement
मागणी वाढू लागल्याने त्यांनी राहत्या घराचं फूड सेंटरमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. 2010 मध्ये थोरात दांम्पत्याने 'वैष्णवी फुड सेंटर'ची स्थापना केली. आता याठिकाणी जेवणासाठी नागरिकांची सतत गर्दी असते. सकाळपासून ते रात्रीपर्यंत अनेक नागरिक येथील जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी करतात. कमी दरात चविष्ट जेवण मिळत असल्याने अनेक विद्यार्थी त्यांचे नियमित ग्राहक बनले आहेत.
advertisement
कमी दरात जेवण
घरगुती चव, स्वच्छता, आणि मनापासून सेवा या गोष्टींवर या फूड सेंटरमध्ये भर दिला जातो. या ठिकाणी अत्यंत कमी दरात चविष्ट जेवण मिळतं. यांच्या जेवणामध्ये पोळीभाजी, उपवासाचे पदार्थ, गोड पदार्थांचा समावेश आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jul 31, 2025 6:15 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Best Food In Pune: कोथरूडमध्ये चविष्ट जेवण शोधताय? 'हे' ठिकाण ठरू शकतं उत्तम पर्याय









