ठाण्याचं फेमस चटाक चायनिज, फक्त 20 रुपयांपासून डिश, खाण्यासाठी लागतात रांगा

Last Updated:

Thane Famous Food: ठाण्यात चटाक चायनिज इथं अगदी स्वस्तात चायनिजच्या स्पेशल डिश मिळतात. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची इथं नेहमीच गर्दी असते.

+
ठाण्यात

ठाण्यात फेमस चटाकचं चायनिज, फक्त 20 रुपयांपासून डिश, विद्यार्थ्यांच्या लागतात रांगा

साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे: सध्या मुंबई आणि ठाण्यात अनेक ठिकाणी चायनीजचे स्टॉल पाहायला मिळतात. परंतु ठाण्यातील एका चायनीज हॉटेलमध्ये कॉलेजच्या तरुण-तरुणींची मोठी गर्दी होतेय. त्याचं कारण म्हणजे इथे मिळणारी चायनीज म्हणजेच शेजवान चटणी ही होममेड असून, इथे पाळली जाणारी हायजिन सुद्धा या सगळ्या विद्यार्थ्यांना फार आवडतेय. ठाणे स्थानकापासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर जोशी- बेडेकर कॉलेज समोरच महेंद्र पटेल या तरुणाने चटाक चायनिज सुरू केले आहे. त्याच्या याच व्यवसायाबद्दल लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
ठाण्यातील महेंद्र आणि त्याची पत्नी दोघेही उच्चशिक्षित असून स्वत:चा व्यवसाय करण्याचं त्यांचं नियोजन होतं. त्यांनी चायनिज स्टॉल सुरू करण्याचा निर्णय घेतला. चटाक चायनिज असं नाव त्यांनी आपल्या व्यवसायाला दिलं. याठिकाणी चायनीज चिली, राईस असे पदार्थ फक्त 40 रुपयांपासून मिळतात. इथं हायजिन सुद्धा मेंटेन करत असल्यामुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांची सकाळी 11 वाजल्यापासूनच गर्दी होते.
advertisement
कॉलेजच्या मुलांसाठी स्वस्ता चायनिज
चटाकमध्ये मंचाव सूप, चायनीज पकोडा, आलू चिली या डिश फक्त 40 रुपये, सोया चिली सुध्दा 40 रुपये , व्हेज क्रिस्पी, चटाक स्पेशल राईस या सगळ्या पदार्थांची किंमत फक्त 20 रुपयांपासून सुरू होते. इथे मिळणाऱ्या फ्रँकीची सुद्धा खूप क्रेज आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला 15 हून अधिक प्रकार खायला मिळतील. ज्यामध्ये व्हेज फ्रँकी, व्हेज मयोनीज चीज फ्रँकी, व्हेज नूडल्स मायोनीज असे सगळे प्रकार उपलब्ध आहेत. खास कॉलेजच्या मुलांसाठी म्हणून स्वस्तात चांगले पदार्थ मिळावे हाच उद्देश असल्याचं महेंद्र सांगतो.
advertisement
चिलीला मोठी मागणी
'मी आणि माझ्या पत्नीने जेव्हा हा व्यवसाय सुरू केला, तेव्हा आम्हाला इतका प्रतिसाद अपेक्षित नव्हता. परंतु आता आमच्या चटणीची घरगुती टेस्ट पाहून एकदा खाऊन गेलेले गिऱ्हईक पुन्हा आमच्याकडे आवर्जून येतात. आमच्या चटाक मध्ये मिळणाऱ्या चिलीला गिऱ्हाईकांची अधिक मागणी आहे.' असे महेंद्र पटेल यांनी सांगितले.
दरम्यान, तुम्हाला देखील हायजिन मेंटेन केलेले चायनिज खायचे असेल तर ठाणे स्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या चटाक चायनिजला भेट देऊ शकता. जोशी बेडेकर कॉलेजच्या अगदी बाजूलाच हे ठिकाण आहे.
view comments
मराठी बातम्या/Food/
ठाण्याचं फेमस चटाक चायनिज, फक्त 20 रुपयांपासून डिश, खाण्यासाठी लागतात रांगा
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement