कॉलेजनंतर जॉब न करता व्यवसायची इच्छा, डोंबिवलीतील तरुणी विकते चीज केक आणि डेझर्ट, video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
सध्या अनेकजण व्यवसायात आपलं नशीब आजमावून पाहत आहेत. डोंबिवलीत सुद्धा एक तरुणी गेले दीड वर्ष स्वतःच चीज केकचा व्यवसाय करत आहे.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
डोंबिवली : सध्या अनेकजण व्यवसायात आपलं नशीब आजमावून पाहत आहेत. डोंबिवलीत सुद्धा एक तरुणी गेले दीड वर्ष स्वतःच चीज केकचा व्यवसाय करत आहे. ही तरुणी आठवड्याचे दोन दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार डोंबिवलीमधील पेंढारकर कॉलेजच्या समोर स्वतःचा चीज केकचा व्यवसाय करते आणि इतर दिवस घरातूनच हा व्यवसाय करते.
advertisement
धनश्रीच्या व्यवसायाचे नाव युनिकेक्स असे असून दर शनिवार आणि रविवार या दोन दिवशी संध्याकाळी सात वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत तिचा हा चीज केकचा व्यवसाय असतो. या स्टॉलवर तुम्हाला ब्ल्यूबेरी चीज केक, नुटेला चीज केक, बिस्कोफ चीज केक हे फक्त 130 रुपयांना मिळतील. तर चोकोचीज ब्राउनी ही 75 रुपये आणि केक सिकल 40 रुपयांना मिळतील.
advertisement
ग्लास केकमध्ये सुद्धा इथे तुम्हाला खूप ऑप्शन मिळतील ज्यामध्ये ब्ल्यूबेरी, स्ट्रॉबेरी, पाईनअॅपल आणि मँगो ग्लास केकचा समावेश आहे. यांची किंमतही 60 रुपयांपासून सुरू होते. धनश्री आठवड्यातील या दोन दिवसांमध्ये साधारण 40 ते 50 चीज केकचा व्यवसाय करते. अनेक डोंबिवलीकर आवर्जून तिच्या चीज केकची चव चाखण्यासाठी पेंढारकर कॉलेजच्या समोर तिच्या स्टॉलला भेट देतात.
advertisement
'मी इयत्ता बारावीमध्ये असल्यापासूनच हा व्यवसाय करत आहे. सध्या मी बँकिंग आणि इन्शुरन्समध्ये पहिल्या वर्षात शिकत आहे. मला पूर्वीपासूनच केक वगैरे बनवण्यामध्ये खूप आवड होती. कॉलेज झाल्यानंतर खरंतर मला जॉब न करता व्यवसाय करण्याची इच्छा असल्याने याच्याच विचाराने यावर मी काम करायला सुरुवात केली आहे', असे धनश्रीने सांगितले.
मंडळी तुम्हाला सुद्धा वेगवेगळ्या फ्लेवरचे आणि चीझी असे असणारे चीज केक ट्राय करायचे असतील, तर आवर्जून डोंबिवली स्थानकापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या पेंढारकर कॉलेजच्या समोर स्टॉल लावणाऱ्या धनश्रीच्या युनिकेक्सला शनिवार आणि रविवारी या दोन दिवशी जाऊन तुम्ही भेट देऊ शकता.
advertisement
Location :
Thane,Maharashtra
First Published :
February 04, 2025 6:41 PM IST
मराठी बातम्या/मनी/
कॉलेजनंतर जॉब न करता व्यवसायची इच्छा, डोंबिवलीतील तरुणी विकते चीज केक आणि डेझर्ट, video