Malvani Food : अस्सल मालवणी नॉनव्हेज थाळी, घरगुती जेवणाचा आस्वाद घ्या फक्त 150 रुपयांत, मुंबईत हे आहे लोकेशन
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
घरगुती चवीचं आणि स्वच्छ अन्न कमी दरात मिळावं, या उद्देशाने मालवणी कट्टा सुरू करण्यात आलं.
मुंबई : वाढदिवसाची पार्टी असो, मित्र-मैत्रिणींना ट्रीट द्यायची असो किंवा फक्त एखाद्या दिवशी स्वस्तात मस्त घरगुती जेवण करायचं असलं, तरी नालासोपाऱ्यातील मालवणी कट्टा हे ठिकाण उत्तम पर्याय ठरत आहे. नालासोपारा (पूर्व) रेल्वे स्थानकापासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर असलेलं हे रेस्टॉरंट जानू भागुराम नक्ते आणि त्यांची लेक आयेशा नक्ते यांनी सुरू केलं आहे.
घरगुती चवीचं आणि स्वच्छ अन्न कमी दरात मिळावं, या उद्देशाने मालवणी कट्टा सुरू करण्यात आलं. आयेशाने आपल्या वडिलांना सांगितलं की, मराठी माणूस व्यवसायात कमी उतरतो, पण बदलाची सुरुवात आपल्यापासून व्हायला हवी. तिच्या या विचाराने प्रेरित होऊन दोघांनी मिळून हे रेस्टॉरंट उभारलं.
Mumbai Food : भट्टी शोरमा आणि मोमोज, फक्त 70 रुपयांपासून घ्या आस्वाद, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?
advertisement
येथील व्हेज थाळी केवळ परवडणारी नसून अत्यंत तृप्त करणारी आहे. फक्त 130 रुपयांत मध्ये दोन चपाती, भात, आमटी, दोन प्रकारच्या भाज्या, सोलकडी, पापड आणि एक गोड पदार्थ असा पूर्ण मेन्यू मिळतो. विशेष म्हणजे इथे प्रत्येक वारानुसार वेगवेगळ्या भाज्या आणि आमटी दिली जाते.
मालवणी कट्टातील मसालेही विशेष आहेत. हे सर्व मसाले घरगुती पद्धतीने तयार केले जातात आणि त्यात खास मालवणी स्पेशल मसाल्यांचा वापर केला जातो. त्यामुळे प्रत्येक पदार्थाला पारंपरिक आणि झणझणीत चव मिळते.
advertisement
नॉनव्हेज प्रेमींसाठीही येथे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. बोंबील फ्राय, कोळंबी मसाला, क्रॅब करी, कोळंबी फ्राय यांसारख्या पदार्थांसह विविध प्रकारच्या ताज्या मास्यांचे पदार्थ इथे मिळतात. तसेच, चिकन आणि इतर नॉनव्हेज पदार्थांची सुरुवात 150 रुपयांपासून होते. नालासोपारा पूर्व स्टेशनपासून अगदी ब्रिजसमोरच मालवणी कट्टा हे रेस्टॉरंट आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 29, 2025 3:32 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Malvani Food : अस्सल मालवणी नॉनव्हेज थाळी, घरगुती जेवणाचा आस्वाद घ्या फक्त 150 रुपयांत, मुंबईत हे आहे लोकेशन

