फ्रीजवर चुकूनही ठेऊ नका 5 गोष्टी, आयुष्यभर पश्चाताप करायची येईल वेळ
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
वास्तुशास्त्रानुसार फ्रिजवर काही वस्तू ठेवणे अशुभ मानले जाते. पैसे, ट्रॉफी, बांबू रोप, औषधे, आणि फिश टँक फ्रिजवर ठेवल्याने आर्थिक आणि मानसिक समस्या होऊ शकतात. सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी या वस्तू वेगळ्या जागी ठेवाव्यात.
आजकालच्या काळात फ्रिज हे प्रत्येक घरातील अत्यावश्यक वस्तूंपैकी एक आहे. विशेषतः उन्हाळ्यात त्याशिवाय काम होऊ शकत नाही. मात्र, घर सजवताना अनेक जण फ्रिजच्या वर काही वस्तू ठेवतात. पण हे योग्य आहे का? वास्तुशास्त्रानुसार, फ्रिजवर काही गोष्टी ठेवणे आर्थिक अडचणी निर्माण करू शकते आणि जीवनात अनेक समस्या आणू शकतात.
फ्रिजवर ठेवल्यास नुकसान होणाऱ्या गोष्टी
पैसे आणि सोन्याचे दागिने : ज्योतिषाचार्य ऋषिकांत मिश्रा शास्त्री यांच्या मते, फ्रिजवर पैसे किंवा सोन्याचे दागिने ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे आर्थिक संकट येऊ शकते. तसेच घरातील सुख-शांतीवरही परिणाम होतो.
बांबूचे रोप : बांबूचे रोप लोक नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घरात ठेवतात. पण हे रोप फ्रिजवर ठेवणे शुभ मानले जात नाही. असे केल्याने कोणताही लाभ होत नाही, असे वास्तुशास्त्र सांगते.
advertisement
ट्रॉफी आणि पुरस्कार : ट्रॉफी किंवा पुरस्कार फ्रिजवर ठेवून घर सजवण्याचा प्रयत्न अनेकजण करतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार, असे केल्याने घरावर नकारात्मक परिणाम होतो. तसेच आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
फिश टँक : घर सुशोभित करण्यासाठी काही लोक फ्रिजवर फिश टँक ठेवतात. मात्र, असे केल्याने माशांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि ते लवकर मरतात.
advertisement
औषधे : फ्रिजवर औषधे ठेवण्याची सवय अनेकांना असते. मात्र, फ्रिजमधील उष्णतेमुळे औषधांची परिणामकारकता नष्ट होते. त्यामुळे औषधे नेहमी थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवावीत.
वास्तुशास्त्राचे महत्त्व : फ्रिज हे फक्त एक यंत्र नसून, त्यावर वस्तू ठेवण्याचे योग्य नियम पाळल्यास घरातील सुख-समृद्धी टिकून राहते. त्यामुळे वास्तुशास्त्राचे पालन करून घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवणे शक्य होते.
advertisement
हे ही वाचा : कपाळावर टिळा का लावावा? 99 टक्के लोकांना माहीत नसेल त्यामागचं अध्यात्मिक कारण, जाणून घ्या प्रत्यक्ष ज्योतिषांकडून…
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 09, 2024 10:44 AM IST