Bhaji Vade Recipe : फुरफूरे वडे, नाव वाचून हसू येईल पण कांदा-बटाटा भजीपेक्षाही भारी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Wheat Flour Furfure Vade Recipe : नेहमीच्या कांदा-भजीला पर्याय असे हे फुरफूरे वडे अगदी काही मोजक्या साहित्यात बनतं. नाव जरी विचित्र वाटत असलं तरी त्याची कृती खूप सोपी आहे.
थंडी म्हटलं की काहीतरी गरमागरम खावंसं वाटतं. मग यात कांदा, बटाटा भजी असो वा बटाटा किंवा आणखी कोणते वडे. आजवर तुम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे वडे, भजी खाल्ली असेल. पण तुम्ही कधी फुरफूरे वडे खाल्ले आहेत का? फुरफुरे वडे.... नाव वाचूनच तुम्हाला हसू आलं असेल. पण एकदा का तुम्ही हे वडे खाल्ले तर कांदा-बटाटा भजीही विसराल.
नेहमीच्या कांदा-भजीला पर्याय असे हे फुरफूरे वडे अगदी काही मोजक्या साहित्यात बनतं. नाव जरी विचित्र वाटत असलं तरी त्याची कृती खूप सोपी आहे. ही रेसिपी खूप जुनी आहे. जी आता काही लोकांना माहितीही नसेल. काही लोकांनी त्याचं नाव ऐकलं असेल, वाचलं असेल पण कधी बघितलं नसेल किंवा पाहिलं असेल. आता तुम्हालाही हे नाव वाचून ही रेसिपी काय आहे? कशी बनवायची? हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल. तर आता बिलकुल वेळ न घेता थेट फुरफूरे वड्यांसाठी लागणारं साहित्य आणि त्याची कृती पाहुयात.
advertisement
फुरफूरे वड्यांसाठी साहित्य
एक वाटी गव्हाचं पीठ
अर्धी वाटी दही
रॉक सॉल्ट
बारीक चिरलेलं आलं
बारीक चिरलेला लसूण
बारीक चिरलेली हिरवी मिरची
बारीक चिरलेली कोथिंबीर
बारीक चिरलेला कांदा
तळण्यासाठी तेल
फुरफूरे वडे कसे बनवायचे? कृती
गव्हाचं पीठ आणि दही थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्या, चांगलं घोटून घ्या. आता भांड्यावर झाकण ठेवून हे मिश्रण 3-4 तास उबदार ठिकाणी आंबवत ठेवा. काही वेळाने मिश्रण फुललेलं दिसेल.
advertisement
आता या मिश्रणात यात रॉक सॉल्ट, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेलं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा टाकून मिक्स करून घ्या.
एका कढईत तेल गरम करा. एक छोटा चमचा पाण्यात बुडवून घ्या. भांड्यातील मिश्रण थोडं थोडं करू चमच्यात घेऊन तेलात सोडा आणि मंद आचेवर वडे तळून घ्या.
advertisement
हे वडे तेलात फुरफूर असा आवाज येतो म्हणून ते फुरफूरे वडे. अगदी टम्मं फुकतात आणि बाहेरून क्रिस्पी आतून नरम असतात. शेफ विष्णू मनोहर यांनी त्यांच्या मास्टर रेसिपीज या युट्यूब चॅनेलवर हा रेसिपी व्हिडीओ पोस्ट केला आहे.
advertisement
तुम्ही कधी हे फुरफूरे वडे केले होते का? खाल्ले होते का? नाहीतर एकदा करून पाहा आणि कसे झाले आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
Location :
Delhi
First Published :
Nov 21, 2025 9:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Bhaji Vade Recipe : फुरफूरे वडे, नाव वाचून हसू येईल पण कांदा-बटाटा भजीपेक्षाही भारी









