Winter Recipe: हिवाळ्यात जवस- ड्रायफ्रूटचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे? जाणून घ्या सोपी रेसिपी

Last Updated:

हिवाळ्यामध्ये खास करून हे जवसाचे आणि ड्रायफ्रूटचे लाडू तयार करू शकता. अतिशय झटपट असे हे लाडू बनवून तयार होतात. डॉक्टर प्रज्ञा तल्हार यांनी लाडूची ही रेसिपी सांगितलेली आहे.

+
हिवाळ्या‎ title=हिवाळ्या साठी करा हे पौष्टिक लाडू
‎ />

हिवाळ्या साठी करा हे पौष्टिक लाडू

छत्रपती संभाजीनगर: हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे. हिवाळ्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवले जातात. त्यामध्ये कोणी डिंकाचे लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू किंवा मेथीचे लाडू अशा वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवत असतात. हिवाळ्यामध्ये खास करून हे जवसाचे आणि ड्रायफ्रूटचे लाडू तयार करू शकता. अतिशय झटपट असे हे लाडू बनवून तयार होतात. त्याची रेसिपी सांगितलेली आहे डॉक्टर प्रज्ञा तल्हार यांनी.
लाडूसाठी लागणारे साहित्य
एक वाटी जवस, अर्धा वाटी अक्रोड, अर्धा वाटी खजूर, एक वाटी गूळ, दोन चमचे पंपकिन सीड, एक चमचा खसखस आणि थोडसं तूप एवढे साहित्य लागेल. जवस, अक्रोड आणि पंपिंग सीड यामध्ये ओमेगा थ्री हे मोठ्या प्रमाणात असतं आणि ते आपलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करत.
लाडू बनविण्याची कृती
‎‎सर्वप्रथम एक वाटी जवळ हा चांगल्या रीतीने भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडसं तूप टाकून अक्रोड भाजायचं आणि पंपिंग सीड देखील भाजून घ्यायच्या. त्यानंतर थोडसं तूप टाकून खजूर देखील चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं. आता हे भाजून घेतलेले साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं. एका पॅनमध्ये थोडसं पाणी घालायचं आणि त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा गुळ व्यवस्थित रित्या पातळ करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये एक चमचा खसखस टाकायचे.
advertisement
ते व्यवस्थित रित्या त्यामध्ये भाजून घ्यायची. ‎हे सर्व भाजून झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण पावडर तयार करून घेतली आहे ती टाकायची आणि एकजीव करून घ्यायचं. आणि एक छोटा चमचा भरून त्यामध्ये तूप देखील तुम्ही टाकू शकता. सर्व एकत्र करून एकजीव करून घ्यायचं. आणि थोडसं थंड झाल्यानंतर तुम्ही याचे लाडू तयार होतात. तर अशा सोप्या पद्धतीने हे लाडू तयार होतात. ज्यांना हाय कोलेस्ट्रॉल आहे त्यांना नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Recipe: हिवाळ्यात जवस- ड्रायफ्रूटचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे? जाणून घ्या सोपी रेसिपी
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement