advertisement

Birthday Wishes: बॉसच्या चमच्यांपासून ऑफिसमधल्या खास मित्रांपर्यंत, सर्वांसाठी वाढदिवसाच्या भन्नाट शुभेच्छा!

Last Updated:

Birthday Wishes in Marathi: वाढदिवस जेव्हा आपल्या बॉसचा असतो, तेव्हा त्यांना नेमका काय मेसेज करावा असा प्रश्नच पडतो. आता मात्र याबाबत अजिबात काळजी करू नका.

बर्थडे आहे बॉसचा...!
बर्थडे आहे बॉसचा...!
मुंबई : आपल्या जवळच्या व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त आपण व्हॉट्सअ‍ॅपवर भन्नाट स्टेटस ठेवतो. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरदेखील त्यांचे फोटो शेअर करतो. तसंच त्यांना पर्सनली खास मेसेज आणि इमोजी पाठवतो. परंतु वाढदिवस जेव्हा आपल्या बॉसचा असतो, तेव्हा त्यांना नेमका काय मेसेज करावा असा प्रश्नच पडतो. आता मात्र याबाबत अजिबात काळजी करू नका. कारण इथं तुम्हाला बॉससाठी, ऑफिसमधल्या मित्र-मैत्रिणींसाठी एकापेक्षा एक अशा शुभेच्छा मिळतील. ज्या वाचून त्यांचा दिवसही उत्तम जाईल.
तुम्ही माझे आदर्श आहात, कठोर परिश्रम आणि चिकाटी यशाकडे घेऊन जाते याचे तुम्ही प्रतीक आहात, तुम्हाला दीर्घायुष्य आणि खूप सुख लाभो...वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बॉस..!
आयुष्यात कुठलाही प्रसंग आला तरी त्याला हसतमुखाने सामोरे जाणे सोपे नाही, आयुष्याची 50 वर्षे आनंदात, उत्साहात व्यतीत केल्याबद्दल तुम्हाला अनेक शुभेच्छा...तुमच्या पुढील आयुष्यात आनंदाची भर पडत राहो हीच इच्छा...Happy 50th Birthday Boss...!
advertisement
जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज होती, तेव्हा तू साथ दिलीस, माझ्या प्रत्येक संकटात ढाल होऊन उभा राहिलास, थँक्यू भावा माझी नेहमीच काळजी घेतल्याबद्दल...तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
तू मित्र नाही भाऊ आहे आपला, रक्ताचा नाही पण जीव आहे आपला...वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा...!
साधी राहणी उच्च विचारसरणी असणाऱ्या, तोंड उघडल्यावर शिव्याच बोलणाऱ्या, पण मनाने साफ असणाऱ्या आमच्या मैत्रिणीला, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा...!
advertisement
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात, मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात, अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही...म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे...वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा...!
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झालाय थोडा लेट, पण शुभेच्छा येतील तुला थेट, वाढदिवसाच्या लै लै शुभेच्छा...!
बॉसचा चमचा म्हणून आहे ज्याची ओळख, त्याचा आहे आज खास दिवस, वाढदिवसाच्या शुभेच्छा चमच्या...!
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Birthday Wishes: बॉसच्या चमच्यांपासून ऑफिसमधल्या खास मित्रांपर्यंत, सर्वांसाठी वाढदिवसाच्या भन्नाट शुभेच्छा!
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement