Happy Diwali Padwa Wishes : पाडव्याच्या शुभेच्छा द्यायच्या तर अशा; जोडीदार खूश झालाच समजा

Last Updated:

Happy Diwali Padwa Wishes In Marathi : जोडीदाराला दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी मेसेज शोधत असाल तर तुमच्यासाठी आम्ही इथं एकापेक्षा एक सुंदर असे शुभेच्छा मेसेज घेऊन आलो आहोत. जे वाचले, पाहिले की जोडीदार खूश होईल.

News18
News18
कार्तिक प्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक. 2 नोव्हेंबरला हा दिवस आहे. या दिवसाला बलिप्रतिपदा असंही म्हणतात. दिवाळी पाडव्याच्या दिवशी पती-पत्नीच्या नात्याला विशेष असं महत्त्व असतं. या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळते आणि त्याला उदंड आयुष्य लाभावं यासाठी प्रार्थना करते. या वेळी पती पत्नीला ओवाळणी स्वरुपात काही भेटवस्तू देतो. पण गिफ्टसोबत शुभेच्छाही हव्याच. अशाच दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा.
advertisement
दिवाळी पाडव्यासाठी तुम्ही जोडीदाराला शुभेच्छा देण्यासाठी मेसेज शोधत असाल तर तुमच्यासाठी आम्ही इथं एकापेक्षा एक सुंदर असे शुभेच्छा मेसेज घेऊन आलो आहोत.
तुम्ही माझ्यासाठी जगातील सुंदर गिफ्ट आहात
या शुभदिनी तुम्हाला उत्तम आरोग्य, आयुष्य लाभो हीच सदिच्छा!
दिवाळी पाडवा शुभेच्छा!
---------------------------------------------------
साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!
उत्तम दिनाचे महात्म्य आहे!
सुखद ठरो हा छान पाडवा,
advertisement
त्यात असूदे अवीट गोडवा!
दिवाळी पाडवा शुभेच्छा!
---------------------------------------------------
आज बलिप्रतिपदा,
दिवाळीचा पाडवा.
राहो सदा नात्यात गोडवा.
---------------------------------------------------
पणतीचा उजेड अंगणभर राहू दे,
लक्ष्मीचा वास घरोघर राहू दे
माझ्यासाठी जिथे तू तिथेच आहे घर,
तुझा सहवास जन्मभर राहू दे,
दिवाळी पाडवा शुभेच्छा!
सप्तजन्मीचे सात वचन,
साथ देणार तुला कायम
तुझ्या प्रेमाचीच ओढ राहील कायम
advertisement
दिवाळी पाडवा शुभेच्छा
---------------------------------------------------
बंध आपल्या प्रेमाचे असेच वाढ जावो
सुख आणि आनंद आपल्या आनंदात असाच सदैव राहो
दिवाळी पाडवा शुभेच्छा!
---------------------------------------------------
दुःखाची सावलीही तुझ्याजवळ न येवो
चेहरा तुझा कायम असाच हसरा राहो
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
---------------------------------------------------
वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती
पण तुझी साथ कधी न सुटती,
advertisement
हीच इच्छा कायमस्वरूपी मनी
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
---------------------------------------------------
आज पवित्र पाडवा, काल झालेले लक्ष्मीचे आगमन
अशा मंगल समयी आपल्या मंगल भविष्याची पायाभरणी होवो
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Happy Diwali Padwa Wishes : पाडव्याच्या शुभेच्छा द्यायच्या तर अशा; जोडीदार खूश झालाच समजा
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement