Happy Ganesh Chaturthi Whatsapp Status : बाप्पा तुझं हसू फुलांसारखं निरागस, गणेशोत्सवासाठी हटके व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस

Last Updated:

Happy Ganesh Chaturthi Whatsapp Status In Marathi : गणेशोत्सव म्हणून बाप्पाचं स्टेट ठेवायचं असेल तर आम्ही तुमच्यासाठी एकापेक्षा एक हटके असे स्टेटस आणले आहेत. ज्यात गणपतीच्या सुंदर प्रतीमा आणि सोबत शुभेच्छा संदेशही आहेत.

News18
News18
मुंबई : आता घराबाहेर पडलात की ठिकठिकाणी गणपती बाप्पा दिसतील. घराघरात, रस्त्यारस्त्यावरच कशाला अगदी सोशल मीडिया आणि मोबाईल पाहिला तर सगळीकडे बाप्पाच बाप्पा. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअॅप अगदी बाप्पामय झालेलं दिसेल. प्रत्येकाने आपल्या डीपीच्या जागी लाडक्या बाप्पाचा फोटो आणि स्टेटसही बाप्पाचं ठेवलं असेल. तुम्हीही गणपतीचे असे व्हॉट्सअॅप स्टेसस शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
27 ऑगस्ट गणेश चतुर्थी. बाप्पा विराजमान होतील. गणेशोत्सव म्हणून बाप्पाचं स्टेट ठेवायचं असेल तर आम्ही तुमच्यासाठी एकापेक्षा एक हटके असे स्टेटस आणले आहेत. ज्यात गणपतीच्या सुंदर प्रतीमा आणि सोबत शुभेच्छा संदेशही आहेत. हे फोटो तुम्ही व्हॉट्सअॅपलाही ठेवू शकता. शिवाय शुभेच्छा म्हणूनही पाठवू शकता.
advertisement
बाप्पा तुझं हसू फुलांसारखं निरागस
तुझं आगमन आनंद देणारं अमूल्य,
तुझ्या कृपाशिर्वादाने जीवन होवो मंगलमय.
गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा
गणराया, तुझ्या आशीर्वादाने
प्रत्येक स्वप्नाला नवा मार्ग मिळो,
प्रत्येक हृदयात श्रद्धेचा दीप उजळो.
गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा
advertisement
गणराया, तूच आहेस संकटमोचक,
तूच आहेस सुखकर्ता,
तुझ्या चरणीच आमचं आयुष्य होतं मंगलमय.
भक्तीच्या फुलांनी सजलेला हा सण,
नात्यांच्या गोडीतून उमलतो प्रत्येक क्षण.
गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा
ढोल ताशांच्या गजरात,
मोदकाच्या सुवासात,
बाप्पा आपल्या भेटीला आले!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
मातीच्या मूर्तीपासून हृदयातील देवत्वापर्यंत,
प्रत्येक क्षणात तुझीच ओढ,
गणराया, तूच आहेस आमच्या जीवनाचा आधार.
गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा
बाप्पाच्या आगमनाला
सजली सर्व धरती
नसानसात भरली स्फुर्ती
गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!
advertisement
अवघी सुष्टी करतेय नमन
होतंय माझ्या बाप्पाचे आगमन
गणपती बाप्पा मोरया!
विघ्नहर्त्याच्या जयघोषात दुमदुमो आकाश,
भक्तीच्या रंगात रंगो प्रत्येकाचा श्वास.
गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा
advertisement
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव सर्वांना...
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
तुझं नाव घेता-घेता जीवनाची दिशा बदलो,
तुझ्या चरणी मस्तक टेकवताना सगळं दुःख हरपून जावो.
गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा
advertisement
आरतीच्या सुरांत तुझं मंगल गान,
भक्तांच्या मनात तुझं दैवी स्थान,
गणपती बाप्पा मोरया, सदैव राहो तुझा आशीर्वाद महान.
मोदकांचा प्रसाद, लाल फुलांचा हार ,
नटून - थटून बाप्पा तयार,
वाजत गाजत बाप्पा घरात,
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Happy Ganesh Chaturthi Whatsapp Status : बाप्पा तुझं हसू फुलांसारखं निरागस, गणेशोत्सवासाठी हटके व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement