advertisement

Vitamin E : व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे मुख्य फायदे, त्वचा, केसांबरोबरच शरीराच्या अनेक समस्यांवर आहे उत्तर

Last Updated:

व्हिटॅमिन ई कॅप्सूल केवळ त्वचा आणि केसांना नाही तर शरीराच्या इतर अनेक समस्यांपासूनही आराम देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. रोगप्रतिकारक शक्ती, फॅटी लिव्हर, संप्रेरक संतुलन अशा अनेक समस्यांवर व्हिटॅमिन ई उपयुक्त ठरतं.

News18
News18
मुंबई : व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल बहुतेक वेळा त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या निवारणासाठी वापरली जाते. ही कॅप्सूल केवळ त्वचा आणि केसांना नाही तर शरीराच्या इतर अनेक समस्यांपासूनही आराम देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
रोगप्रतिकारक शक्ती - व्हिटॅमिन ई नियमित घेतल्यानं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि संसर्ग सहसा होत नाही किंवा ते होण्याचं प्रमाण कमी होतं. बदलत्या हवामानात वारंवार आजारी पडणाऱ्यांसाठी, ही कॅप्सूल अनेक आजारांवर उपाय ठरू शकते.
तणावापासून दूर रहा : व्हिटॅमिन ई हे एक प्रभावी अँटिऑक्सिडंट आहे, शरीराचा ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारून अनेक आजारांपासून यामुळे आराम मिळू शकतो.
advertisement
वृद्धत्व : व्हिटॅमिन ई शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करते, यामुळे पेशी जास्त काळ निरोगी राहण्यास मदत होते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. हे व्हिटॅमिन वृद्धत्व कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतं.
फॅटी लिव्हर : व्हिटॅमिन ई मध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लमेटरी गुणधर्म असतात. फॅटी लिव्हर सारख्या यकृताच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी हे घटक उपयुक्त ठरू शकतात. हे व्हिटॅमिन यकृत निरोगी राखण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकतं.
advertisement
संप्रेरक संतुलन : संप्रेरक संतुलित करण्यासाठी व्हिटॅमिन ईची मदत होते. व्हिटॅमिन ई मधे आढळणारे घटक महिलांमधे मासिक पाळीच्या समस्या, मूड स्विंग आणि संप्रेरक असंतुलन सुधारण्यास मदत करू शकतात.
त्वचेसाठी उत्तम - व्हिटॅमिन ई मधे आढळणारे गुणधर्म त्वचेला आतून पोषण देतात, निस्तेजपणा कमी करतात आणि नैसर्गिक चमक वाढवतात, म्हणूनच हे व्हिटॅमिन फेस क्रीम आणि सीरममध्ये वापरलं जातं. व्हिटॅमिन ई त्वचेची दुरुस्ती करण्यासाठी आणि कोलेजन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं. कोणतंही औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Vitamin E : व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे मुख्य फायदे, त्वचा, केसांबरोबरच शरीराच्या अनेक समस्यांवर आहे उत्तर
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement