Periods Pain : मासिक पाळीतल्या दुखण्याला करा बाय, या उपायांनी पाळीचे दिवस होतील सुसह्य
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
मासिक पाळीच्या दिवसांत, संत्री, डार्क चॉकलेट, बीट, काकडी इ. खाल्ल्यानं वेदना कमी होतील असं आहारतज्ज्ञ सांगतात. तुम्हालाही मासिक पाळीदरम्यान वेदना तीव्र होत असतील, पोट फुगतं असेल किंवा जडपणा जाणवत असेल तर आहारतज्ज्ञांनी सुचवलेले पदार्थ मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी प्रभावी ठरतील.
मुंबई : काहीजणींना मासिक पाळीच्या वेदना खूप होतात, काहींना कमी दुखतं. काहीजणींना अजिबात दुखत नाही. पण रक्तस्राव खूप होतो. मासिक पाळीचे दिवस सुसह्य करण्यासाठी तुमचा आहार काय आहे हेदेखील खूप महत्त्वाचं आहे. केवळ त्या दिवसात नाही तर एरवीही तुम्ही काय खाता यावर तुमच्या तब्येतीचं गणित अवलंबून असतं.
मासिक पाळीच्या दिवसांत, संत्री, डार्क चॉकलेट, बीट, काकडी इ. खाल्ल्यानं वेदना कमी होतील असं आहारतज्ज्ञ सांगतात. तुम्हालाही मासिक पाळीदरम्यान वेदना तीव्र होत असतील, पोट फुगत असेल किंवा जडपणा जाणवत असेल तर आहारतज्ज्ञांनी सुचवलेले पदार्थ मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी प्रभावी ठरतील.
advertisement
बहुतेकदा मासिक पाळी दरम्यान पोट दुखतं, पायात पेटके येतात, वेदना होतात आणि पोटात गॅस तयार होतो. या दिवसांत खाण्या-पिण्यातल्या काही सवयी वेदना कमी करायला मदत करु शकतात. याबाबत, आहारतज्ज्ञ प्राची यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे.
मासिक पाळीतल्या वेदना कमी करणारे पदार्थ -
पुदिना आणि लिंबू - पाळीमध्ये पोट फुगत असेल तर पुदिना आणि लिंबू खावं असा सल्ला आहारतज्ज्ञ प्राची यांनी दिला आहे.
advertisement
बीट - रक्ताची गुणवत्ता आणि रक्तप्रवाह सुधारण्यासाठी बीट खाणं चांगलं.
डार्क चॉकलेट - मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट खाऊ शकता. यामुळे मूडही सुधारतो.
मनुका – मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी मनुका खा असा सल्ला आहारतज्ज्ञ प्राची देतात.
advertisement
संत्री - संत्र खाल्ल्यानं मूड सुधारण्यास मदत होते. पाळी दरम्यान संत्री खाणं हा एक चांगला पर्याय आहे.
काकडी – मासिक पाळी दरम्यान पोट फुगतं, यासाठी काकडी उपयुक्त आहे. काकडी खाल्ल्यानं वेदनाही कमी होतात.
आणखी उपयुक्त टिप्स -
- आल्याचा तुकडा पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यानं वेदना कमी होण्यास मदत होते.
- हळदीमुळेही पाळीच्या वेदना कमी होतात. यासाठी हळद पाण्यात उकळून ते पाणी पिणं उपयुक्त आहे.
- केळी खाल्ल्यानं मासिक पाळीच्या वेळी सूज येण्याचं प्रमाण कमी होतं.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 05, 2025 5:39 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Periods Pain : मासिक पाळीतल्या दुखण्याला करा बाय, या उपायांनी पाळीचे दिवस होतील सुसह्य







