उपाशीपोटी पिऊन बघा हे 3 ज्यूस, त्वचा होईल अगदी सतेज आणि चमकदार, Video
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी व्हिटॅमिन खूप महत्वाचे असतात. त्यासाठी आपल्या आहारात व्हिटॅमिनयुक्त पदार्थ असणे आवश्यक असते.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : चेहरा सुंदर दिसावा यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. अनेकवेळा पार्लरमधील काही ट्रीटमेंट सुद्धा घेतले जातात. मात्र, त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी व्हिटॅमिन खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे रोजच्या आहारात व्हिटॅमिनचा समावेश करावा असे, डॉक्टरांकडून नेहमी सांगण्यात येते. चेहऱ्यावर मेकअपवाला ग्लो आणण्यासाठी रोजच्या जेवणात काही महत्त्वाचे फळ घेतल्यास पार्लरची गरज पडत नाही. कोणकोणते फळ त्वचेला तजेलदार ठेवण्यास मदत करतात? याबद्दल त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी काय करावं?
त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी व्हिटॅमिन खूप महत्त्वाचे असतात. त्यासाठी आपल्या आहारात व्हिटॅमिनयुक्त पदार्थ असणे आवश्यक असते. यासाठी तुम्ही सर्वात आधी सकाळी उपाशीपोटी बीट रूट, टोमॅटो किंवा लिंबाचा ज्यूस घेऊ शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेमध्ये तुम्हाला अनेक बदल दिसून येतील, असं डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात.
advertisement
त्यानंतर दररोजच्या आहारात पालेभाज्या आणि फळभाज्यांचा समावेश देखील करायला पाहिजे. गाजर, मुळा, बीट, पालक, मेथी आणि इतरही फळभाज्या तुमच्या आहारात असतील तर तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही. त्यानंतर सिजनेबल फळांचा समावेश देखील तुमच्या आहारात असायला हवा. त्यासाठी तुम्ही ठरवलेल्या वेळेत ज्यूस, जेवण आणि फळांचे सेवन करायला पाहिजे. फळ काही एकदम महागडी वगैरे घेण्याची गरज नाही. सिजनेबल फळ खावून तुम्ही त्यांचे आरोग्य सुधारित ठेऊ शकता.
advertisement
अनेक मुलींना डोळ्याखाली काळे वर्तुळ येतात. ही वर्तुळ व्हिटॅमिन बी 12 आणि आयरनच्या कमतरतेमुळे येतात. त्यासाठी तुमच्या आहारात पेंड, खजूर, शेवग्याच्या शेंगा, पालक याचा समावेश करायचा आहे. त्याचबरोबर टिव्ही, मोबाईल बघणे जर कमी केले तर डोळ्याखालील काळे वर्तुळ कमी होण्यास मदत होते.
आपले दररोजचे खानपान जर व्यवस्थित असेल तर आपली त्वचा आणि आरोग्य दोन्ही अगदी ठणठणीत राहते. त्यामुळे दररोजचे जेवण वेळेवर घेऊन त्यात व्हिटॅमिनचा समावेश करा, त्याचबरोबर बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळा. ह्या काही गोष्टी केल्या तर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही, असे डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी सांगितले.
advertisement
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Feb 25, 2025 1:57 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
उपाशीपोटी पिऊन बघा हे 3 ज्यूस, त्वचा होईल अगदी सतेज आणि चमकदार, Video







