इयरफोन खूप घातक! अलका याग्निकसारखा आजार होऊ नये म्हणून आजच सोडा 'ही' सवय

Last Updated:

आजकाल इयरफोन म्हणजे महत्त्वाची गोष्ट झाली आहे. घरातून निघताना ते सोबत नसतील तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं.

कानांवर प्रचंड वाईट परिणाम होऊ शकतो.
कानांवर प्रचंड वाईट परिणाम होऊ शकतो.
विशाल भटनागर, प्रतिनिधी
मेरठ : जर तुम्हाला कानात इयरफोन घालून मोठमोठ्यानं गाणी ऐकायची सवय असेल, तर आता ही सवय जरा मोडा. नाहीतर हे तुमच्या श्रवण यंत्रणेवर भारी पडू शकतं. डॉक्टर सुमित उपाध्याय यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते सांगतात की, सुप्रसिद्ध गायिका अलका याग्निक यांची ऐकण्याची क्षमता ज्याप्रमाणे गेलीये. त्याप्रमाणे या आजाराशी अनेकजण झुंज देत आहेत. त्यामुळे सर्वांनी आपापली काळजी घेणं आवश्यक आहे.
advertisement
डॉक्टरांनी सांगितलं की, आता विविध कार्यक्रमांमध्ये डीजे लावला जातो. आजकाल ज्याप्रकारचं म्युझिक लोक ऐकतात त्याचा कानांवर प्रचंड वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे ऐकण्याची क्षमताही हळूहळू कमी होऊ शकते. यासाठी सर्वात घातक ठरतात ते इयरफोन.
advertisement
आजकाल इयरफोन म्हणजे महत्त्वाची गोष्ट झाली आहे. घरातून निघताना ते सोबत नसतील तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. अनेकदा आपण इयरफोनमधून एवढ्या मोठ्यानं गाणी ऐकतो की, आपल्याला आजूबाजूचा आवाजही ऐकू येत नाही, जे जास्त घातक आहे.
डॉक्टरांनी सांगितलं की, जर तुम्हाला दोन्हीपैकी एका जरी कानाने कमी ऐकू येत असेल आणि असं दीर्घकाळासाठी झालं तर अजिबात हलगर्जीपणा करू नका. ताबडतोब डॉक्टरांकडे जा. सुरुवातीला योग्य उपचार होऊ शकतात नाहीतर हळूहळू ऐकण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय एका कानावर झालेला परिणाम कधी दुसऱ्या कानापर्यंत पोहोचतो हे कळतसुद्धा नाही. जर वेळीच यावर उपचार केले तर आपण आपली श्रवण क्षमता वाचवू शकता. दरम्यान, आजकाल कानाच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक झपाट्यानं वाढतेय, त्यामुळे कानांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अनेकजण तर सतत इयरफोन कानाला लावूनच ठेवतात, जे टाळायला हवं.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
इयरफोन खूप घातक! अलका याग्निकसारखा आजार होऊ नये म्हणून आजच सोडा 'ही' सवय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement