Summer Care - उन्हाळ्यात डोळ्यांवर होईल परिणाम, निष्काळजीपणा ठरु शकतो धोकादायक
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
उन्हाळ्यात काही वेळा खूप डोळ्यांवरही परिणाम जाणवतो. उन्हाळ्यात डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण निष्काळजीपणा भविष्यात धोकादायक ठरू शकतो.
मुंबई: उन्हाळ्यात काही वेळा खूप डोळ्यांवरही परिणाम जाणवतो. उन्हाळ्यात डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण निष्काळजीपणा भविष्यात धोकादायक ठरू शकतो.
उन्हाळा येताच सूर्यप्रकाश अधिक तीव्र होतो, पारा वाढू लागतो आणि त्याचा थेट परिणाम शरीरावर होतो. अशा परिस्थितीत, आपण त्वचेची काळजी, सनस्क्रीन आणि घामापासून संरक्षण यासारख्या मुद्द्यांकडे लक्ष देतो, पण अनेकदा डोळ्यांची काळजी घेतली जात नाही.
डोळे सर्वात नाजूक आणि महत्वाच्या इंद्रियांपैकी एक आहे आणि हवामान बदललं की सर्वात आधी डोळ्यांवर परिणाम होतो. सोपे उपाय करुन डोळ्यांचं रक्षण करू शकता.
advertisement
उष्ण हवामानाचा डोळ्यांवर परिणाम
1. डोळे वारंवार कोरडे होणं
गरम हवा आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे डोळ्यांमधील ओलावा कमी होतो. यामुळे कोरडेपणा आणि डोळ्यांमध्ये जळजळ, खाज सुटणं आणि लालसरपणा यासारख्या समस्या जाणवतात.
2. डोळ्यांत जळजळ होणं
सूर्यप्रकाश थेट डोळ्यांत जातो तेव्हा जळजळ आणि पाणी येणं यासारख्या समस्या वाढतात.
advertisement
3. स्क्रीनचा वापर करताना काळजी घ्या
दिवसाचा बराचसा वेळ स्क्रीनसमोर असाल तर, उष्ण हवामानाचा डोळ्यांवरही परिणाम होतो, तेव्हा थकवा आणि अंधुक दिसणं या समस्या वाढू शकतात.
4. धूळ आणि अॅलर्जी
उन्हाळ्यात उष्णता आणि धुळीमुळे डोळ्यांना संसर्ग आणि अॅलर्जी होण्याचा धोका असतो.
उन्हाळ्यात डोळ्यांची अशी घ्या काळजी -
गॉगलचा वापर : अतिनील किरणांपासून संरक्षण होईल असे चष्मे वापरण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तेजस्वी प्रकाश डोळ्यांना हानी पोहोचवणार नाही.
advertisement
दिवसभरात वारंवार डोळे धुवा: दिवसातून किमान 2-3 वेळा स्वच्छ पाण्यानं डोळे धुण्याची सवय लावा. यामुळे धूळ आणि घामापासून आराम मिळेल.
स्क्रीन टाइम कमी करा: स्क्रीनवर जास्त वेळ घालवावा लागत असेल तर 20-20-20 नियम पाळा, म्हणजे दर 20 मिनिटांनी 20 सेकंद 20 फूट दूर पहा. यामुळे डोळ्यांना थोडा आराम मिळेल.
advertisement
कोल्ड कॉम्प्रेसचा वापर
डोळ्यांमध्ये थकवा किंवा जळजळ होत असेल तर कापूस थंड पाण्यात भिजवा आणि काही मिनिटं डोळ्यांवर ठेवा. यामुळे सूज आणि जळजळ दूर होईल.
पाणी पित राहा: उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता असेल तर डोळ्यांवरही परिणाम होतो. डोळ्यांची आर्द्रता कायम ठेवण्यासाठी पुरेसं पाणी प्यायला विसरू नका.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 14, 2025 6:16 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Care - उन्हाळ्यात डोळ्यांवर होईल परिणाम, निष्काळजीपणा ठरु शकतो धोकादायक