Summer Care : उन्हाळी आहारासाठी टिप्स, योग्य आहारानं शरीराला मिळेल ऊर्जा

Last Updated:

उन्हाळ्यात शरीर थंड आणि निरोगी ठेवणं खूप महत्वाचं आहे. या काळात, योग्य आहार घेतल्यानं पचनसंस्था मजबूत राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. काही रंगीबेरंगी फळं उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतातच पण आरोग्यही निरोगी ठेवतात.

News18
News18
मुंबई : उन्हाळ्यात हंगामी फळं, भाज्या आणि हलकं अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. या ऋतूत हमखास मिळणारी रंगीबेरंगी पाच फळं नक्की खा, कारण यामुळे पोट निरोगी राहिल. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत आणि उन्हाळ्यात आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हे सर्व घटक महत्त्वाचे आहेत. यात पाण्याचं प्रमाण जास्त असल्यानं शरीर नैसर्गिकरित्या थंड राहतं.
उन्हाळ्यातील बहुतेक समस्या पोट आणि पचनाशी संबंधित असतात. त्यामुळे आपलं पचन निरोगी ठेवण्यासाठी पोटाचं आरोग्य चांगलं ठेवणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात तुमच्या पोटासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर असलेल्या 5 सुपरफूड्सबद्दल जाणून घेऊया.
उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी ही फळं खा
1. कलिंगड - कलिंगड भरपूर पाणीदार, हायड्रेटिंगसाठी उपयुक्त आहे. उन्हाळ्यात कलिंगडाला जास्त पसंती असते. यात 92 टक्के पाणी असतं, यामुळे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत होते. कलिंगडामुळे डिहायड्रेशन टाळता येतं आणि पचन सुधारतं.
advertisement
2. पपई - पपईला पाचक सुपरफूड म्हटलं जातं. पपईमध्ये असलेल्या पपेन एंझाइममुळे पचन सुधारतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. यकृताला डिटॉक्सिफाय करण्यासाठी याची मदत होते.
3. काकडी - पोट थंड करण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे. काकडीमध्ये भरपूर फायबर आणि पाणी असतं, यामुळे शरीर डिटॉक्स करता येतं आणि आम्लता आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
advertisement
4. लिंबू - लिंबू हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं सुपरफूड आहे. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं, पचन सुधारणं आणि शरीर आतून स्वच्छ करण्यासाठी लिंबू उपयुक्त आहे.
5. दही - दही म्हणजे पोटासाठी अमृतासारखं आहे. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, यामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारतं आणि पचन मजबूत होतं. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास देखील याचा उपयोग होतो.
advertisement
उन्हाळ्यात योग्य आहार घेतल्यानं शरीराला नैसर्गिकरीत्या थंडावा आणि ऊर्जा मिळते. कलिंगड, पपई, काकडी, लिंबू आणि दही हे पदार्थ खाल्ल्यानं पचनसंस्था मजबूत होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर नैसर्गिकरित्या थंड होतं.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Care : उन्हाळी आहारासाठी टिप्स, योग्य आहारानं शरीराला मिळेल ऊर्जा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement