गटारी अमावस्या: गटारीला 5 पॅक दारू प्यायल्याने काय होईल? दारूमुळे शरिरावरचा ताबा कसा सुटतो?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Gatari Amavasya: श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी अनेकजण गटारी साजरी करतात. या दिवशी जास्त मद्यपान करणं जीवावर बेतू शकतं.
छत्रपती संभाजीनगर: हिंदू धर्मीय व्रत-वैकल्यांचा श्रावण महिना पवित्र मानतात. त्यामुळे या महिन्यात अनेक घरांत मद्य आणि मांसाहार टाळला जातो. परंतु, श्रावण सुरू होण्याअगोदरच गटारी साजरी केली जाते. मांसाहारी पदार्थांचे आणि मद्याचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. परंतु, अशा मद्य सेवनाने शरीरातील काही अवयवांना मोठी हानी पोहोचू शकते आणि प्रसंगी जीवघेणं देखील ठरू शकतं. याबाबत छत्रपती संभाजीनगरमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. अक्षय कुलकर्णी यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
श्रावणचा संपूर्ण एक महिना दारू सेवन करणे आणि मांसाहार करणे अनेकजण टाळतात. त्यामुळे काहीजण श्रावण महिन्याच्या अगोदर येणाऱ्या अमावस्येला अर्थात गटारी म्हणून साजरी करतात. या दिवशी पार्टी करून मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन केले जाते. मेडिकल सायन्समध्ये एकाच वेळी खूप जास्त दारू पिण्याला बिंज अल्कोहोल ड्रिंकिंग असे म्हणतात. अशा प्रकारचे मद्यसेवन शरीरासाठी हानिकारक ठरू शकते, असे डॉक्टर कुलकर्णी सांगतात.
advertisement
बिंज अल्कोहोल म्हणजे काय?
काहीजण 2 तासांमध्ये 5 पॅक पेक्षा जास्त मद्यसेवन करतात. अशा मद्यपानामुळे आपल्या शरीरातील दारूचे प्रमाण 0.08 ग्रॅम डीसी लिटर पेक्षा जास्त वाढते. तेव्हा शरीराला अपायकारक ठरते. साधारणपणे एवढ्या जास्त प्रमाणात मद्यसेवन केल्यानंतर शरीरातील काही मुख्य बदल होतात. शरीरावरील ताबा सुटणे, स्वादुपिंड दाह यासारख्या आजारामुळे पोटावर सूज येते आणि उलट्या येणे असे प्रकार सुरू होतात, असेही डॉ. कुलकर्णी सांगतात.
advertisement
मद्यसेवनाचं प्रमाण काय असावं?
view commentsशरीरासाठी 30 एमएल मद्यसेवन करणे क्षमतेत आहे. यापेक्षा जास्त मद्यसेवन केल्यास त्याचे अधिक धोके निर्माण होऊ शकतात. त्यामुळे गटारी अमावस्येला तरुणांनी खूप जास्त प्रमाणात मद्यसेवन करू नये. जास्त काळापासून मद्यसेवन करत असल्यास रक्ताची उलटी होण्यासारखा प्रकार घडू शकतो. तसेच जीवावर बेतण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो, असेही डॉक्टर सांगतात.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
July 23, 2025 2:31 PM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
गटारी अमावस्या: गटारीला 5 पॅक दारू प्यायल्याने काय होईल? दारूमुळे शरिरावरचा ताबा कसा सुटतो?

