Pepper : काळ्या मिरीचे सात मोठे फायदे, मधासोबत खाल्ल्यानं आजार पळतील दूर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
काळ्या मिरीसारखे भारतीय मसाले, औषधी गुणधर्म असल्यानं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. विशेषतः मधासोबत खाल्ल्यानं शरीरासाठी हे मिश्रण अमृतासारखं आहे. आयुर्वेदातही काळी मिरी आणि मध हे मिश्रण अनेक आजारांपासून आराम मिळवून देण्यासाठी वापरलं जातं.
मुंबई : तब्येत बरी नसेल तर आधी घरात उपचार केले जातात, त्यात भारतीय मसाल्यांचं महत्त्व खूप आहे. काळी मिरी आणि मध हे मिश्रण स्वादिष्ट लागतं आणि आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. हे मिश्रण नियमित खाल्ल्यानं प्रतिकारशक्ती वाढेल.
काळ्या मिरीसारखे भारतीय मसाले, औषधी गुणधर्म असल्यानं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. विशेषतः मधासोबत खाल्ल्यानं शरीरासाठी हे मिश्रण अमृतासारखं आहे. आयुर्वेदातही काळी मिरी आणि मध हे मिश्रण अनेक आजारांपासून आराम मिळवून देण्यासाठी वापरलं जातं.
1. प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त
advertisement
काळ्या मिरीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. मधासोबत खाल्ल्यानं शरीराला बॅक्टेरिया आणि विषाणूंशी लढण्याची ताकद मिळते. ऋतूनुसार होणारे आजार, तसंच वारंवार होणाऱ्या सर्दी-खोकल्यापासूनही यामुळे आराम मिळतो.
2. पचनसंस्था सुधारणा
काळ्या मिरीमध्ये असलेले पाइपरिन तत्व पचन व्यवस्था सक्रिय करण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे अन्नाचं पचन व्यवस्थित होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी, पोटातील गॅस आणि अपचन कमी करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे.
advertisement
3. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
काळ्या मिरीमुळे चयापचयाचा वेग गतिमान होतो. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. काळी मिरी मधासोबत खाल्ल्यानं भूक नियंत्रणात राहते. यामुळे अनावश्यक चरबी कमी होते. पोट हलकं आणि निरोगी राहतं.
4. घसा खवखवणे आणि सर्दी आणि खोकल्या उपयुक्त
काळी मिरी आणि मधाच्या मिश्रणामुळे घसादुखी आणि सर्दी आणि खोकल्यापासून त्वरित आराम मिळतो. हे नैसर्गिकरित्या श्लेष्मा साफ करते. काळी मिरी खाल्ल्यानं घशाला आराम मिळतो आणि श्लेष्म कमी होतं.
advertisement
5. रक्तदाब नियंत्रण
काळ्या मिरीमध्ये असलेल्या पाइपरिन या घटकामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हे मिश्रण हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. उच्च रक्तदाबावर नियंत्रण, हृदय निरोगी ठेवण्यासाठी हे मिश्रण उपयुक्त आहे.
6. त्वचा
काळ्या मिरीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनते. त्वचेतील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी यामुळे मदत होते. काळी मिरी आणि मधाच्या मिश्रणामुळे त्वचेची चमक वाढते आणि मुरुमं कमी होतात.
advertisement
7. कर्करोग रोखण्यासाठी उपयुक्त
काळ्या मिरीमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आढळतात. हे नियमित खाल्ल्यानं कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून बचाव होतो.
हे मिश्रण बनवण्यासाठी अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर आणि एक चमचा मध एकत्र करा, आणि दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे मिश्रण खा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 07, 2025 8:50 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Pepper : काळ्या मिरीचे सात मोठे फायदे, मधासोबत खाल्ल्यानं आजार पळतील दूर