Tomato Facepack : चमकदार त्वचेसाठी वापरा टोमॅटो, टोमॅटोमुळे चेहरा दिसेल फ्रेश
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
त्वचेची योग्य काळजी घेतली तर त्वचेशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. अनेकदा चेहऱ्यावर फक्त रासायनिक उत्पादनं लावली जातात. त्यापेक्षा टोमॅटोसारखे नैसर्गिक उपाय त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.
मुंबई : टोमॅटोचा वापर करुन चेहरा तजेलदार ठेवायला खूप मदत होते. म्हणूनच, त्वचा तज्ज्ञही चेहऱ्यावर लावण्यासाठी टोमॅटोची शिफारस करतात. कोरड्या आणि निर्जीव त्वचेसाठी टोमॅटो उपयुक्त ठरतो. त्वचेची योग्य काळजी घेतली तर त्वचेशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. अनेकदा चेहऱ्यावर फक्त रासायनिक उत्पादनं लावली जातात. त्यापेक्षा टोमॅटोसारखे नैसर्गिक उपाय त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.
चमकदार त्वचेसाठी टोमॅटोचा वापर कसा करावा ?
त्वचा तज्ज्ञांच्या मते, टोमॅटोमध्ये असलेलं लाइकोपीन, चेहऱ्यावरचे मुरुम कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. सुरकुत्या कमी होण्यासाठी टोमॅटो परिणामकारक आहे. चेहऱ्याचा टोन सुधारण्यासाठी, जळजळ कमी करण्यासाठी, आणि त्वचा नैसर्गिकरित्या चांगली ठेवण्यासाठी टोमॅटो उपयोगी आहे. टोमॅटोमुळे त्वचेला हायड्रेशन मिळतं.
advertisement
चेहऱ्यावर टोमॅटो लावण्यासाठी टिप्स -
टोमॅटो अर्धा कापून चेहऱ्यावर चोळू शकता. संपूर्ण चेहऱ्यावर नीट चोळल्यानंतर, 5 ते 10 मिनिटं ठेवून मग चेहरा धुवा. 10 ते 15 मिनिटं टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावू शकता.
टोमॅटो फेस पॅक
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. यामुळे टोमॅटो चेहऱ्यावर लावल्यानं त्वचेला चमक येते. फेस पॅक बनवण्यासाठी टोमॅटोचा गर दही आणि मध मिसळून फेस पॅक तयार करा. 10 मिनिटं चेहऱ्यावर ठेवल्यानंतर चेहरा धुवा.
advertisement
मुलतानी मातीमध्ये टोमॅटोचा रस मिसळून फेस पॅक बनवता येतो.यासाठी एक चमचा मुलतानी मातीमध्ये दोन चमचे टोमॅटोचा रस मिसळा. त्यात अर्धा चमचा दहीही घालता येईल.
टोमॅटोचा रस बेसनमध्ये मिसळून फेस पॅक तयार करा.वीस मिनिटं चेहऱ्यावर ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. त्वचेचं टॅनिंग कमी होतं आणि चेहऱ्यावर चमक येते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 05, 2025 6:53 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Tomato Facepack : चमकदार त्वचेसाठी वापरा टोमॅटो, टोमॅटोमुळे चेहरा दिसेल फ्रेश








