Dark Circles : डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळांवर उत्तर, नैसर्गिक चमक परत आणण्यासाठी करा हे उपाय

Last Updated:

डोळ्यांखाली आलेली काळ्या वर्तुळांमुळे आरोग्याची स्थिती कळते. अनेकदा अपुरी झोप हे त्यामागचं कारण असतं. काळी वर्तुळं का होतात आणि ती घालवण्यासाठी काय करायचं याविषयी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

News18
News18
मुंबई : डोळ्यांखाली आलेली काळ्या वर्तुळांमुळे आरोग्याची स्थिती कळते. अनेकदा अपुरी झोप हे त्यामागचं कारण असतं. काळी वर्तुळं का होतात आणि ती घालवण्यासाठी काय करायचं याविषयी तज्ज्ञांनी सल्ला दिलाय.
काळी वर्तुळं येण्यामागची कारणं काय आहेत आणि काळी वर्तुळं कशी दूर करता येतील याविषयी आहारतज्ज्ञ सोनिया नारंग यांनी काही टिप्स दिल्यात. डोळ्यांखाली काळी वर्तुळं दिसू लागतात, तेव्हा तुम्ही आजारी आहात का असा प्रश्न विचारला जातो. मुलं किंवा मुली, प्रत्येकाला डोळ्यांखाली काळी वर्तुळाची समस्या असू शकते.
काळी वर्तुळं चेहऱ्यावर आल्यानं डोळे सतत थकलेले दिसतात. पाहूयात यामागची कारणं -
advertisement
झोपेचा अभाव
काळी वर्तुळं येण्याचं पहिलं कारण म्हणजे झोप न लागणं. झोपेच्या कमतरतेमुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि डोळ्यांखाली पाणी साठतं. डोळ्यांच्या सभोवतालची त्वचा पातळ असते, थकव्यामुळे रक्तवाहिन्या फुगतात तेव्हा त्या डोळ्यांखाली अधिक दिसतात त्यामुळे डोळ्यांखाली निळा किंवा जांभळा रंग दिसू लागतो. झोपेच्या कमतरतेमुळे त्वचेची नैसर्गिक चमकही हरवते आणि त्वचा पिवळी पडू लागते, त्यामुळे काळ्या धमन्या गडद दिसू लागतात. झोपेच्या कमतरतेमुळे सूज येते ज्यामुळे काळी वर्तुळं अधिक दिसू लागतात. यासाठी दररोज पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा आणि किमान 7-8 तास शांत झोप घ्या.
advertisement
कमी हिमोग्लोबिन
शरीरात हिमोग्लोबिन कमी असेल तर त्वचेच्या ऊतींपर्यंत ऑक्सिजन योग्य प्रकारे पोहोचत नाही आणि डोळ्यांखाली पिवळसरपणा येऊ लागतो. ज्यामुळे रक्तवाहिन्या अधिक दिसू लागतात आणि काळी वर्तुळं दिसू लागतात. अनेकदा हे थकव्यामुळं होतं. पालक आणि मनुका यांसारखे लोहयुक्त पदार्थ खाल्ले तर समस्या कमी होऊ शकते.
पाण्याची कमतरता
शरीरात डिहायड्रेशन असेल तर डोळ्यांखालील त्वचा निस्तेज, कोरडी आणि पातळ दिसू लागते. त्यामुळे डोळे खोल गेल्यासारखे दिसतात आणि रक्तवाहिन्या अडकून काळी वर्तुळं निर्माण होतात. खराब हायड्रेशनमुळे रक्त प्रवाह कमी होतो, ज्यामुळे शरीरातून विषारी पदार्थ हळूहळू बाहेर पडतात आणि शरीर थकल्यासारखं दिसतं. म्हणूनच पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे.
advertisement
आरोग्यातील बदल
काळी वर्तुळं आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे उद्भवत नाहीत तर पातळ त्वचेवर रक्त जमा झाल्यामुळे देखील दिसतात. हे अनुवांशिक किंवा चेहऱ्यावरील शरीर रचनेमुळेही होऊ शकतं.
या टिप्सचा होईल उपयोग
काळी वर्तुळं कमी करण्यासाठी बटाट्याचा रस 10 ते 15 मिनिटं डोळ्यांखाली लावू शकता.
advertisement
काळी वर्तुळं कमी करण्यासाठी हळदीची पेस्ट देखील प्रभावी आहे.
काकडीचा रस किंवा काकडीचे काप डोळ्यांखाली लावल्यानंही फायदा होतो.
डोळे स्वच्छ करताना चोळू नका.
रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल लावल्यानंही फायदा होतो.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Dark Circles : डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळांवर उत्तर, नैसर्गिक चमक परत आणण्यासाठी करा हे उपाय
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement