पोटातला सगळा गॅस बाहेर पडेल, हलकं वाटेल! दररोज करा Fart Walk
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
चालल्यानं आतड्यांमधून गॅस रिलीज होतो आणि अन्नपचन व्यवस्थित होतं. यामुळे पोटाच्याही सर्व समस्यांवर आराम मिळू शकतो.
काजल मनोहर, प्रतिनिधी
जयपूर : गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, इत्यादी समस्या आता सामान्य झाल्या आहेत. कारण धावपळीत आपल्याला तीनही वेळी सकस आहार घेणं आणि वेळच्या वेळी जेवणं शक्य नसतं. पावसाळ्यात तर पचनसंस्था कमकुवत होते, त्यामुळे हा त्रास आणखी वाढतो. मात्र त्यावर आराम मिळवणंही सहज शक्य आहे.
आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत, ज्यामुळे गॅसवर कायमचा आराम मिळू शकतो. असं म्हणतात की, चालणं हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. यामुळेच पोटाच्याही सर्व समस्यांवर आराम मिळू शकतो. कारण चालल्यानं आतड्यांमधून गॅस रिलीज होतो आणि अन्नपचन व्यवस्थित होतं.
advertisement
जर तुम्हाला गॅससोबत सतत ढेकर येत असतील, छातीत जळजळ होत असेल, तर जेवल्यानंतर थोडावेळ चाला. यामुळे हळूहळू आराम मिळेल. शिवाय पचनक्षमताही उत्तम होईल. गॅस येण्यासाठी केलेल्या वॉकला 'फार्ट वॉक' म्हणतात. यामुळे पोटातल्या अन्नपदार्थांचं लहान लहान कणांमध्ये रुपांतर होऊन पौष्टिक तत्त्वांचं पचन होतं.
advertisement
अन्नपदार्थांनी पोट गच्च होणं हेच गॅस होण्यामागचं प्रमुख कारण असतं. फार्ट वॉक केल्यानं पोटात अडकलेला सगळा गॅस बाहेर निघू शकतो. या वॉकमुळे आतड्यांवर ताण येतो, ज्यामुळे हळूहळू गॅस बाहेर पडतो. दररोज 30 मिनिटं हा वॉक केल्यानं शुगर लेव्हलही नियंत्रित राहते. तज्ज्ञ मुकेश लोरा सांगतात की, जेवल्यानंतर जवळपास 40 ते 60 मिनिटांनंतर फार्ट वॉकिंग सुरू करायचं. आरामात चालायचं, नाहीतर अस्वस्थ वाटू शकतं. फार्ट वॉक झाल्यानंतर भरपूर पाणी प्यावं. ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
Location :
Jaipur,Rajasthan
First Published :
July 24, 2024 5:13 PM IST