Mushroom: पावसाळ्यात मशरूम चांगले की खराब, ओळखायचे कसे? विकत घेण्यापूर्वी हे माहिती हवंच!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mashroom: पावसाळ्यात अनेकजण मशरूमची भाजी आवर्जून खातात. अनेकांना चांगलं मशरूम किंवा अळिंबी ओळखताही येत नाही. याबाबतच जाणून घेऊ.
मुंबई : जुलै महिना सुरू झालाय आणि पावसाच्या सरींनी संपूर्ण महाराष्ट्र भिजू लागला आहे. या ऋतूमध्ये नैसर्गिकरित्या मशरूम, म्हणजेच अळिंबी उगम पावतात. त्यामुळे बाजारात अळिंबी विक्रीला उधाण आलं आहे. मात्र, या हंगामात मशरूम खरेदी करताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता वाढते. तसेच खराब अळिंबीमुळे आरोग्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो. चांगली अळिंबी ओळखायची कशी? हे जाणून घेऊ.
फसवणुकीचा धोका वाढला
पावसाळ्यात अनेकदा खराब, बुरशी लागलेले किंवा कीड लागलेले मशरूम विक्रीस येतात. हे मशरूम खाल्ल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे खवय्यांनी मशरूम खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी तपासून घ्यायला हव्यात.
काय काळजी घ्यावी?
वीर फॉर्मचे ओम वीर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, “मशरूम घेताना त्याचा रंग तपासा. ओलसरपणा जास्त असेल तर मशरूम ताजं नाही. पांढऱ्या मशरूमवर जर काळपट डाग दिसत असतील तर ते बुरशीचे लक्षण आहे. तसंच मशरूमची देठं सडलेली, नरम असतील तर ती खरेदी करू नयेत. शक्यतो प्रमाणित विक्रेत्यांकडूनच मशरूम खरेदी करावं.”
advertisement
चांगले मशरुम कसे ओळखाल?
रंग: ताजी मशरूम पांढऱ्या, सौम्य रंगाच्या व स्वच्छ दिसतात.
घट्ट पोत: मशरूमचा टोकाचा भाग (कॅप) घट्ट आणि हलकासा लवचीक असतो.
सुगंध: नैसर्गिक मशरुमला सुगंध असतो. कोणताही उग्र किंवा आंबट वास येत नाही.
ओलसरपणा: थोडासा ओलसरपणा असतो, पण चिकटपणा किंवा सडलेपण जाणवत नाही.
देठ: देठ मजबूत आणि घट्ट असतो. नरम वा काळपट झालेला नसतो.
advertisement
खराब मशरूम कशी ओळखाल?
बुरशी किंवा डाग: कॅपवर काळपट, हिरवट डाग किंवा बुरशीसारखी पुटं दिसत असतील तर ती मशरूम खराब आहे.
सडलेला वास: खराब मशरूममधून आंबूस, सडलेला किंवा उग्र वास येतो.
चिकटपणा: कॅप किंवा देठ हाताला चिकट वाटत असल्यास ती मशरूम वापरणे टाळावे.
नरम पोत: देठ दबताच खचला तर ती अळिंबी खाण्यायोग्य नाही.
advertisement
कीड लागलेली: मशरूमवर छिद्रं असतील किंवा कीटक दिसत असतील, तर ती फेकून द्यावी.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 07, 2025 12:26 PM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
Mushroom: पावसाळ्यात मशरूम चांगले की खराब, ओळखायचे कसे? विकत घेण्यापूर्वी हे माहिती हवंच!