Blood Pressure : उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी काय कराल? चुकूनही हे पदार्थ खाऊ नका, अन्यथा मोठ्या संकटात पडाल
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी कमी मिठाचा आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि ताणतणाव कमी करणे आवश्यक आहे. धूम्रपान आणि मद्यपान सोडून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे नियमित घ्या. वजनावर नियंत्रण ठेवा आणि फळे-पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.
उच्च रक्तदाब ही सध्या सर्वसामान्य लोकांमध्ये दिसणारी सामान्य आजार आहे. हा आजार नियंत्रणात ठेवला नाही तर तो जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. डॉ. पॉल रॉबसन मेधी यांनी दिलेल्या या सूचना नक्की पाळा.
कमी मिठाचा आहार घ्या : उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मिठाचे प्रमाण कमी ठेवा. दररोज केवळ 5 ग्रॅम मीठ घ्यावे. जास्त सोडियमयुक्त पदार्थ टाळा. फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचे सेवन वाढवा. यात पोटॅशियम आणि फायबर मुबलक असते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. जास्त चरबीयुक्त व साखरयुक्त पदार्थ टाळा, कारण यामुळे वजन वाढते. वजन वाढल्याने उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.
advertisement
नियमित व्यायाम करा : रोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा. आठवड्यातून पाच दिवस लांब चालणे, योगा, पोहणे यासारख्या हृदयासाठी फायदेशीर व्यायाम प्रकारांचा समावेश करा.
पुरेशी झोप घ्या : रात्रभर 7-8 तास शांत झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. झोपण्यापूर्वी कॉफी, दारू आणि साखरयुक्त पदार्थ टाळा.
ताणतणावावर नियंत्रण ठेवा : ताणतणाव कमी ठेवणे ही उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. ध्यान, प्राणायाम यांचा सराव करून ताण कमी करा. ताणाचे मूळ कारण ओळखा आणि त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
advertisement
धूम्रपान आणि मद्यपान टाळा : धूम्रपान व मद्यपानामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. यासाठी त्वरित धूम्रपान आणि मद्यपान सोडा. याशिवाय नियमित आरोग्य तपासणी करा. घरात रक्तदाब मोजण्याचे यंत्र ठेवा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित तपासणी करा.
औषधांचे सेवन नियमित ठेवा : डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्या. औषधे स्वतःहून बंद करू नका. डॉ. मेधी यांचा सल्ला आहे की, उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि जागरूक राहा.
advertisement
हे ही वाचा : CM Eknath Shinde name plate : CM शिंदेंच्या नावाची पाटी काढली, पुन्हा लावली, नेमकं काय घडलं?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2024 10:37 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Blood Pressure : उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी काय कराल? चुकूनही हे पदार्थ खाऊ नका, अन्यथा मोठ्या संकटात पडाल