पिंपल्समुळे चेहरा दाखवण्याची लाज वाटतेय? ‘या’ घरगुती उपायानं होईल सुटका

Last Updated:

चेहऱ्यावर आलेले पिंपल्स हे सौंदर्याला बाधा देतात. काही घरगुती उपायानं हे पिंपल्स जाऊ शकतात.

+
News18

News18

पुणे, 22 ऑगस्ट : आपला चेहरा चांगला दिसावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी तो वेगवेगळे उपाय करत असतो. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स हे सौंदर्याला बाधा देतात. अनेक उपाय करुनही पिंपल्स जात नाहीत. त्याचे डाग चेहऱ्यावर दिसतात. पिंपल्स कसे घालवावे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचा मार्ग आम्ही सांगणार आहोत. काही घरगुती उपायानं पिंपल्सची समस्या दूर होऊ शकते. पुण्यातले डॉक्टर सुमित चित्ते यांनी ही माहिती दिलीय.
हार्मोनमध्ये होणाऱ्या बदलामुळे पिंपल्स येतात. मुख्यत: तरुण मुला-मुलींना ही समस्या जाणवते. ही त्वचेवर आलेली सूज आहे. त्यामध्ये सुरुवातीला एक गुलाबी ठिपका दिसतो. त्यानंतर शरीरावर काळे डाग पडतात. काही वेळा यामुळे त्वचेवर खड्डे आणि काळे डाग पडतात. त्याने तुमचा चेहरा आणखी खराब दिसतो.
पिंपल्स घालवण्याचे घरगुती उपाय
कडुनिंबाची पावडर आणि मध एकत्र करून त्याचे मिश्रण चेहरा किंवा ज्या भागावर पिंपल्स आलेत तिथं 15 ते 20 मिनिटे लावावे. ते थंडगार पाण्यानं धुवावे. त्यानंतर लोद्र पावडर आणि गुलाबचंद एकत्र करून त्यांचा लेप पिंपल्स आलेल्या भागावर 15 ते 20 मिनिटं लावावा.
advertisement
पिंपल्स घालवण्यासाठी कोरफडीचा गरही उपयुक्त आहे. विशेषत: ज्या व्यक्तीच्या पेशंट्सवर बरीच फोडं झाली आहेत त्यांनी कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावावा. त्यानंतर रक्तचंदन पावडराचा लेप पाण्यासोबत मिक्स करून चेहऱ्याला त्याचा लेप लावावा, त्यामुळे चेहरा तजेलदार दिसतो, अशी माहिती डॉ. चित्ते यांनी दिली. त्याचबरोबर दूध आणि हळद एकत्र करून त्याचा लेप चेहऱ्याला लावणे हा घरगुती उपाय देखील अनेकांना माहिती असून तो फायदेशीर आहे, असं त्यांनी सांगितलं. घरगुती उपाय करुन आठवडाभरात पिंपल्स कमी होत नसतील तर जवळच्या डॉक्टरांना दाखवावे असा सल्ला चित्ते यांनी दिला.
advertisement
( सूचना:  या बातमीतील संबंधित तज्ज्ञाची वैयक्तिक मतं देण्यात आली आहेत. त्याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
पिंपल्समुळे चेहरा दाखवण्याची लाज वाटतेय? ‘या’ घरगुती उपायानं होईल सुटका
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement