Homemade Facewash : घरगुती फेसवॉशनं घ्या चेहऱ्याची काळजी, त्वचा होईल स्वच्छ आणि मुलायम
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
बाहेरच्या फेसवॉशऐवजी स्वयंपाकघरातील गोष्टींचा वापर चेहऱ्यासाठी उपयुक्त ठरतो. जास्त खर्च न करता घरी फेसवॉश तयार करता येतो. या फेसवॉशमुळे त्वचा उजळते आणि त्वचेवर साचलेली धूळ देखील सहज निघून जाते.
मुंबई : चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी महागड्या फेसवॉशऐवजी घरगुती फेसवॉश हा चांगला पर्याय आहे. बाहेरच्या फेसवॉशऐवजी स्वयंपाकघरातील गोष्टींचा वापर चेहऱ्यासाठी उपयुक्त ठरतो. जास्त खर्च न करता घरी फेसवॉश तयार करता येतो. या फेसवॉशमुळे त्वचा उजळते आणि त्वचेवर साचलेली धूळ देखील सहज निघून जाते.
चेहऱ्याची काळजी नीट घेतली नाही तर चेहऱ्यावर मृत त्वचेच्या पेशी जमा राहू शकतात. यामुळे त्वचा तेलकट दिसते. अशा परिस्थितीत चेहरा योग्यरित्या स्वच्छ करणं महत्वाचं आहे. अनेक प्रकारचे क्लीन्सर आणि फेसवॉश उपलब्ध आहेत, परंतु त्वचेला खरोखरच उजळ करणारे आणि एकाच वेळी स्वच्छ करणारे क्लीन्सर फारच दुर्मिळ आहेत आणि उपलब्ध असले तरी ते खूप महाग आहेत. त्वचारोगतज्ज्ञ डॉ. रश्मी शेट्टी यांनी घरातीलच दोन गोष्टींचा वापर यासाठी कसा करावा याविषयी टिप्स दिल्यात.
advertisement
कच्च्या दुधाचा चेहऱ्यासाठी वापर
चेहरा स्वच्छ करण्यासाठी कच्चं दूध चांगलं क्लिंझर आहे. यामुळे त्वचेवर साचलेली धूळ आणि अतिरिक्त तेल निघून जातं. कच्चं दूध सकाळी आणि संध्याकाळी चेहऱ्यावर लावता येतं. एका भांड्यात दूध घ्या, त्यात कापूस बुडवा आणि चेहऱ्यावर घासून घ्या. नंतर चेहरा धुवून स्वच्छ करा. यामुळे त्वचा चांगली स्वच्छ होते.
advertisement
दही आणि बेसन - थोडं बेसन दह्यात मिसळा आणि ते फेसवॉशसारखे चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवा. यामुळे त्वचा चांगली स्वच्छ होते.
काकडीचा रस - दही - दह्यात काकडीचा रस मिसळूनही चेहरा स्वच्छ करता येतो. दही आणि काकडीच्या रसाचं मिश्रण हा चांगला फेसवॉश आहे.
advertisement
टोमॅटोचा गर - टोमॅटोचा गर वापरल्यानं मृत त्वचा काढून टाकता येईल. फेसवॉशऐवजी टोमॅटोचा गरही वापरता येतो. यासाठी टोमॅटोचा गर मिक्सरवर थोडा बारीक करा किंवा टोमॅटोचा रसही यासाठी वापरू शकता. हा गर चेहऱ्यावर लावा आणि हातांनी हलक्या हातानं चेहऱ्यावर चोळा आणि नंतर चेहरा पाण्यानं धुवा आणि चेहरा स्वच्छ करा.
मध आणि कोरफड गर - चेहरा धुण्यासाठी मध आणि कोरफडीचा गरदेखील खूप फायदेशीर आहेत. या दोन्ही गोष्टी समान प्रमाणात मिसळून चेहऱ्यावर लावता येतात. हे मिश्रण हलक्या हातानं घासल्यानंतर चेहरा धुवा. त्वचा स्वच्छ होईल आणि मऊही दिसेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 21, 2025 5:34 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Homemade Facewash : घरगुती फेसवॉशनं घ्या चेहऱ्याची काळजी, त्वचा होईल स्वच्छ आणि मुलायम