Stomach : बद्धकोष्ठता-पोटफुगीनं हैराण ? पचनसंस्थेकडे वेळीच लक्ष द्या, तज्ज्ञांचा सल्ला ऐका
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
सकस आहाराचा अभाव आणि व्यस्त जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठता आणि पोटफुगीची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. यामुळे आहारात काही बदल करणं गरजेचं आहे.
मुंबई : सकस आहाराचा अभाव आणि व्यस्त जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठता आणि पोटफुगीची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. विशेषतः नियमितपणे व्यायाम न करणारे आणि पाणी कमी पिणाऱ्यांमध्ये या दोन्ही समस्या जाणवतात. बद्धकोष्ठता आणि पोटफुगी या पचनसंस्थेशी संबंधित समस्या आहेत आणि दोन्हीही खराब आहारामुळे होऊ शकतात.
बद्धकोष्ठता आणि पोटफुगीचा त्रासातून सुटका हवी असेल तर डॉक्टर अमित मिग्लानी यांनी काही उपाय सांगितलेत. आयबीएस म्हणजेच (इरिटेबल बोवेल सिंड्रोम) हा पचनसंस्थेचा एक प्रकार. त्याचे अनेक प्रकार आहेत. रुग्णाला रात्री इसबगोल वापरण्याचा सल्ला दिला जातो, हा आयुर्वेदिक उपाय आहे. अशा वेळी किवी हे फळ देखील फायदेशीर असल्याचं डॉ. अमित यांनी सांगितलं. या फळात चांगलं फायबर म्हणजेच या फळाची तंतुमयता जास्त असते.
advertisement
ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी अधिक फळं आणि सॅलड खावं. बडीशेपेचं पाणी देखील खूप फायदेशीर आहे. रात्री बडीशेप पाण्यात भिजवा आणि सकाळी हे पाणी प्या, यामुळे बद्धकोष्ठतेपासून खूप आराम मिळेल. तसंच भाजलेल्या अळशीच्या बिया दोन चमचे खाण्यानंही फरक पडेल. चिया सीड्स हा देखील चांगला पर्याय आहे. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी याची मदत होते.
advertisement
पोट फुगणं -
पोट फुगणं म्हणजे पोटात जास्त गॅस निर्माण होणं. अनेक रुग्णांना लॅक्टोजचा त्रास होतो. म्हणजेच दुग्धशर्करा पचवण्याची क्षमता नसणं. यामुळे शरीर दुधात आढळणारे लॅक्टोज, साखर योग्यरित्या पचवू शकत नाही.
अशांना दूध, राजमा, चणे, कोबी आणि अरबी यासारख्या गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
आयबीएस म्हणजेच (इरिटेबल बोवेल सिंड्रोम) असलेल्यांना, कोणत्या अन्नपदार्थांमुळे त्रास होतो याची माहिती दिली जाते काही अन्न पदार्थांचा त्रास होतोच असं नाही, प्रत्येक शरीराची प्रतिक्रिया वेगवेगळी असू शकते. अनेकदा रुग्ण यादीतून इतके अन्नपदार्थ काढून टाकतात की त्यांच्याकडे खाण्यासाठी काहीच चांगले पर्याय उरत नाहीत आणि त्यामुळे त्याला पौष्टिकतेची कमतरता भासते.
अनेकदा दूध पचायला अडचण असेल तर दही घेऊ शकता. दही हे खूप चांगलं प्रोबायोटिक आहे. एखाद्या रुग्णाला सांधेदुखी असेल तर दह्यामुळे त्याचा त्रास वाढू शकतो. अशा वेळी, लॅक्टोज फ्री दूध म्हणजेच बदामाचं दूध किंवा सोया दूध हे पर्याय आहेत. या दोन्हीमध्ये दूध - साखर नसतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 19, 2025 5:56 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Stomach : बद्धकोष्ठता-पोटफुगीनं हैराण ? पचनसंस्थेकडे वेळीच लक्ष द्या, तज्ज्ञांचा सल्ला ऐका