Health Tips : हिवाळ्यात आरोग्य राहील तंदुरुस्त, कोणताच आजार येणार नाही जवळ, फॉलो करा या टिप्स
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
थंडीमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते, त्वचा कोरडी पडते आणि हालचालींमध्ये आळस येतो. या दिवसांत शरीराचं तापमान टिकवणं आणि आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
बीड: हिवाळा सुरू होताच शरीरावर त्याचा थेट परिणाम जाणवू लागतो. थंडीमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते, त्वचा कोरडी पडते आणि हालचालींमध्ये आळस येतो. या दिवसांत शरीराचं तापमान टिकवणं आणि आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, योग्य आहार, व्यायाम आणि त्वचेची काळजी घेतली तर हिवाळ्याचे दिवस आरामदायी ठरू शकतात, अशी माहिती बीड जिल्ह्यातील आरोग्य तज्ज्ञ विलास राठोड यांनी दिली.
थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता देणारे आणि पौष्टिक घटक असलेले अन्नपदार्थ सेवन करणं आवश्यक आहे. आहारात तीळ, गूळ, सुके मेवे, सूप आणि गरम दुधाचा समावेश करावा. तसेच फ्रीजमधील थंड अन्न टाळून गरम आणि ताजं अन्न खावं. हिवाळ्यात डाळिंब आणि पेरू या फळांचं सेवन विशेषतः त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. या फळांमधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला नैसर्गिक ओलावा देतात आणि तेज वाढवतात.
advertisement
हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणे किंवा संध्याकाळी हात-पाय धुणे ही सवयही आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीर उबदार राहतं. कोरड्या त्वचेवर नियमितपणे बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर लावल्यास त्वचा मऊ आणि तजेलदार राहते. थंड वातावरणात त्वचा लवकर कोरडी पडते, त्यामुळे दिवसातून किमान दोन वेळा त्वचेला ओलावा देणं महत्त्वाचं आहे.
advertisement
थंडीच्या दिवसांत व्यायामाकडे अनेक जण दुर्लक्ष करतात, मात्र हा काळ शरीराच्या हालचालींसाठी तितकाच आवश्यक आहे. सकाळी हलका व्यायाम, योगासन किंवा ध्यान केल्याने शरीरात उष्णता टिकते आणि मनही शांत राहते. यामुळे झोप चांगली लागते, ताण कमी होतो आणि शरीर अधिक ऊर्जावान वाटतं. सूर्यप्रकाशात काही वेळ व्यायाम केल्यास व्हिटॅमिन D मिळतं, जे हाडांसाठी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त आहे.
advertisement
एकूणच, हिवाळ्यात आरोग्य जपण्यासाठी आहार, त्वचेची काळजी आणि मानसिक संतुलन या तीन गोष्टींचं संतुलन महत्त्वाचं आहे. योग्य वेळी झोप घेणं, सकाळी कोमट पाणी पिणं, ध्यान करणं आणि नैसर्गिक आहार घेणं. या छोट्या सवयींनी हिवाळा फक्त थंडीचा नाही तर आरोग्याचा उत्सव बनू शकतो.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
October 11, 2025 2:51 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : हिवाळ्यात आरोग्य राहील तंदुरुस्त, कोणताच आजार येणार नाही जवळ, फॉलो करा या टिप्स