Sleep : अपुरी झोप वाढवेल टेन्शन, पूर्ण झोप घेण्याचा प्रयत्न करा, तब्येतीची काळजी घ्या
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
झोप अपूर्ण असेल तर 172 गंभीर आजार होण्याचा धोका असतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातल्या निरीक्षणांनुसार, झोप पूर्ण नसेल तर पार्किन्सन, मधुमेह, हृदयरोग आणि मानसिक आजार होऊ शकतात.
मुंबई : झोप ही शरीरासाठीचं ऊर्जा केंद्र असतं. झोप अपूर्ण असेल तर थकवा येतो आणि चिडचीड होते. पण अपुऱ्या झोपेचे यापेक्षाही गंभीर परिणाम जाणवू शकतात आणि झोप अपूर्ण असेल तर 172 गंभीर आजार होण्याचा धोका असतो.
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातल्या निरीक्षणांनुसार, झोप पूर्ण नसेल तर पार्किन्सन, मधुमेह, हृदयरोग आणि मानसिक आजार होऊ शकतात. झोपेची गुणवत्ता आणि नियमितता हे आरोग्यासाठी झोपेच्या प्रमाणाइतकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे, झोप कशी सुधारू शकतो हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. या अभ्यासात, सुमारे नव्वद हजार नागरिकांंचं निरीक्षण सात वर्ष करण्यात आलं. संशोधनानुसार, झोप अपूर्ण राहिल्यानं पार्किन्सन आजाराचा धोका सदतीस टक्क्यांनी वाढतो.
advertisement
टाइप 2 मधुमेहाचा धोका 36 टक्क्यांपर्यंत, किडनी निकामी होण्याचा धोका 22 टक्क्यांपर्यंत, सीओपीडी, हृदयरोग, नैराश्य यासारखे आजार देखील अनियमित झोपेशी संबंधित आहेत. 92 आजारांपैकी 20 टक्के आजार केवळ चांगल्या झोपेनंच रोखता येतात, असंही आढळून आलं.
झोपेचा त्रास का होतो?
advertisement
रात्री उशिरा मोबाईल किंवा स्क्रीनकडे पाहणं
कामाचा ताण
झोपण्याच्या-उठण्याच्या अनियमित वेळा
रात्री कॅफिन किंवा जड अन्न खाणं
चांगल्या झोपेसाठी सोप्या टिप्स
आठ तासांची झोप गरजेची आहे, पण प्रत्यक्षात लोक सहा तासांपेक्षा कमी झोपतात असं आढळून आलं आहे. नियमित झोपेसाठी दिनक्रम बनवा, दररोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा. स्क्रीन टाइम कमी करा. झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉपपासून दूर रहा.
advertisement
कॅफिन आणि जड जेवण टाळा. रात्री चहा, कॉफी किंवा तळलेलं अन्न खाल्ल्यानं झोपेचा त्रास होतो.
खोलीचं वातावरण शांत आणि अंधारमय ठेवा. मंद प्रकाश, थंड तापमान आणि शांत वातावरण यामुळे झोप सुधारते.
योग आणि ध्यान करा. दिवसातून दहा - पंधरा मिनिटं ध्यान केल्यानं ताण कमी होतो आणि चांगली झोप येते.
advertisement
झोप म्हणजे फक्त विश्रांती नाही तर ती शरीराच्या दुरुस्तीसाठी आणि मानसिक संतुलनासाठी देखील महत्त्वाची आहे. नवीन अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की झोपेची गुणवत्ता आणि नियमितता ही झोपेच्या प्रमाणाइतकीच आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. तुमचीही झोप पूर्ण होत नसेल तर वेळेत त्यात सुधारणा करा, अन्यथा गंभीर आजार होऊ शकतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 06, 2025 6:54 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Sleep : अपुरी झोप वाढवेल टेन्शन, पूर्ण झोप घेण्याचा प्रयत्न करा, तब्येतीची काळजी घ्या


