Mental Health Day 2025 : मानसिक आजार आणि भूतबाधेचा काही संबंध असतो का? डॅाक्टरांनी स्पष्ट सांगितलं

Last Updated:

आपल्याकडे मानसिक आरोग्य म्हणजे वेडेपणा अशा समजाने बघितलं जातं. पण एखाद्या व्यक्तीला कुठला मानसिक आजार असेल तर तो वेडा नाही हे तथ्य आहे.

+
News18

News18

छत्रपती संभाजीनगर : 10 ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. पण आपल्याकडे मानसिक आरोग्य म्हणजे वेडेपणा अशा समजाने बघितलं जातं. पण एखाद्या व्यक्तीला कुठला मानसिक आजार असेल तर तो वेडा नाही हे तथ्य आहे. पण आपल्याकडे एखाद्या व्यक्तीला जर काही मानसिक आजार असेल तर लोक म्हणतात की याला भूतबाधा झाली किंवा हा वेडा झाला पण असं नसते. तर नेमके या विषयाचे काय गैरसमज आहेत किंवा आपण कशी त्या रुग्णाची काळजी घ्यायला हवी? याबद्दलचं मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रश्मिन आंचलिया यांनी माहिती सांगितलेली आहे.
सगळ्यात पहिले तर ज्या देखील व्यक्तीला मानसिक आजार असतो हा व्यक्ती वेडा नाही. यामागे विविध अशी कारणे असू शकतात. सगळ्यात पहिले म्हणजे कामाचा ताण त्यासोबत डिप्रेशन किंवा इतरही गोष्टी यामध्ये असतात. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार होऊ शकतो आणि याच्यावरती चांगला इलाज देखील आहे. 70 टक्के रुग्ण हे या मानसिक आजारातून बरे होत असतात. त्यांना फक्त कौन्सिलिंगची आवश्यकता असते, असं डॉक्टर रश्मिन आंचलिया यांनी सांगितलं आहे.
advertisement
मानसिक आजार झाला म्हणजे तुम्हाला कुठली भूतबाधा झाली असे नसते. त्यामुळे आपण आपल्या डोक्यातून हा गैरसमज काढून टाकायला हवा की याचा काहीतरी दोष असेल, देवाचा काहीतरी शाप असेल किंवा इतरही कुठल्या गोष्टी असतील. तर असं एखादा व्यक्ती मानसिकरित्या आजारी असेल तर आपण त्याला सगळ्यात पहिले हा भावनिक त्यासोबत मानसिक आधार देणं गरजेचं असतं जेणेकरून तो व्यक्ती लवकर हा बरा होईल. त्यामुळे आपल्या डोक्यात जे पण काही वाईट गैरसमज असतील ते आपण काढून टाकायला हवेत, असं असं डॉक्टर रश्मिन आंचलिया यांनी सांगितलं आहे.
advertisement
एखादा व्यक्तीला मानसिक आजार झाला असेल किंवा एखादा डिप्रेशनमध्ये जात असेल तर त्याला सगळ्यात पहिले तुम्ही चांगल्या डॉक्टरांकडे दाखवलं पाहिजे. त्यांचं कौन्सलिंग केलं पाहिजे आणि जर त्यांना योग्य तो इलाज दिला तर हा व्यक्ती परत समाजामध्ये चांगला वागू शकतो. आपल्या जबाबदाऱ्या ज्या आहेत तो नीट पार पाडू शकेल, असंही डॉक्टर रश्मिन आंचलिया यांनी सांगितलं आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Mental Health Day 2025 : मानसिक आजार आणि भूतबाधेचा काही संबंध असतो का? डॅाक्टरांनी स्पष्ट सांगितलं
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement