advertisement

Paracetamol Side Effect : पॅरॅसिटॅमॉलच्या अधिक सेवनाचे होतात गंभीर परिणाम, जाणून घ्या धोके

Last Updated:

Paracetamol Side Effect : ब्रिटनच्या नॉटिंगहॅम विद्यापीठातील संशोधकांनी पॅरॅसिटॅमॉलच्या सेवनाबाबत काही गंभीर खुलासे केले आहेत.

पॅरॅसिटॅमॉलच्या अधिक सेवनाचे होतात गंभीर परिणाम, जाणून घ्या धोके
पॅरॅसिटॅमॉलच्या अधिक सेवनाचे होतात गंभीर परिणाम, जाणून घ्या धोके
नवी दिल्ली :  ताप आला, अंगदुखी होत असेल तर पॅरॅसिटॅमॉलची गोळी पूर्वी घरोघरी असायची. सामान्य किंवा मध्यम स्वरूपाच्या वेदना आणि तापावर उतार पडण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय दुकानात उपलब्ध असणारी ही गोळी असते. तुम्हीही नेहमी या गोळीचं सेवन करत असाल, तर सावध व्हा! या गोळीचे आरोग्यावरील काही गंभीर परिणाम आता समोर आले आहेत. ‘एबीपी’नं त्या बाबत माहिती देणारं वृत्त दिलं आहे.
ब्रिटनच्या नॉटिंगहॅम विद्यापीठातील संशोधकांनी पॅरॅसिटॅमॉलच्या सेवनाबाबत काही गंभीर खुलासे केले आहेत. त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार,पॅरॅसिटॅमॉलचं खूप जास्त सेवन केल्यास ते आरोग्याला हानीकारक ठरू शकतं. या गोळ्यांच्या वारंवार सेवनामुळे 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांच्या किडनीला धोका निर्माण होऊ शकतो. खरं तर पॅरॅसिटॅमॉल गोळ्यांचे आणखीनही काही साईड इफेक्ट्स आहेत. कमी कालावधीमध्ये या गोळ्यांचं अधिक सेवन केलं, तर त्याचा यकृतावर वाईट परिणाम होऊ शकतो.
advertisement

यकृत खराब होण्याचा धोका

दररोज चार ग्रॅम पॅरॅसिटॅमॉल खाल्ल्यानं यकृत खराब होण्याची शक्यता बळावते. कावीळदेखील होऊ शकते. काही केसेसमध्ये कालांतराने हे आजार बरे होऊ शकतात, पण धोका कायम राहतो. त्वचेवर लाल चट्टे, श्वास घेण्यास त्रास होणं, अ‍ॅलर्जी, गॅसेस आणि पित्ताचा त्रास उद्भवू शकतो. काही लोकांना कमी कालावधीसाठी पॅरॅसिटॅमॉलचा वापर किडनीवर परिणाम करू शकतो.
advertisement

किडनीवर वाईट परिणाम

पॅरॅसिटॅमॉल औषधाची मात्रा शरीरात खूप जास्त काळ गेल्यामुळे यकृत पूर्णपणे खराब होण्याची दाट शक्यता असते. यामुळे क्रॉनिक लिव्हर डिसीज होऊ शकतात. काही वेळा यकृत प्रत्यारोपण करण्याची आवश्यकताही भासू शकते. यकृताबरोबरच या औषधाचा किडनी म्हणजे मूत्रपिंडावरही वाईट परिणाम होतो. खूप जास्त काळ पॅरॅसिटॅमॉल घेतल्यानं हळूहळू किडनीची कार्यक्षमता कमी होऊ लागते.
advertisement
पॅरॅसिटॅमॉल औषध सातत्यानं घेतल्यानं शरीराला त्याची सवय होते. अशा लोकांच्या शरीरावर त्या औषधाचे साईड इफेक्ट्स लगेचच दिसून येत नाहीत. मात्र त्यांना हळूहळू इतर कोणत्याही औषधाचा लवकर गुण येत नाही. पॅरॅसिटॅमॉल घेण्याची गरज भासते. पॅरॅसिटॅमॉल वारंवार खूप जास्त कालावधीसाठी घेतल्यानं हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. तसंच मानसिक आरोग्यावरही या औषधाचा वाईट परिणाम होतो. पॅरॅसिटॅमॉलच्या सेवनामुळे नैराश्य आणि चिंता वाढते.
advertisement
हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानं आणि त्यांनी सांगितलेल्या प्रमाणात घेणंच गरजेचं असतं, मात्र बहुतांश लोक सामान्य आजारांवर वारंवार पॅरॅसिटॅमॉल गोळ्यांचं कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सेवन करतात. त्याचा परिणाम लगेच जाणवत नसला तरी कालांतरानं शरीरावरील त्याचे परिणाम उघड होतातच. हे परिणाम आता संशोधनानेही सिद्ध झाले आहेत. त्यामुळे पॅरॅसिटॅमॉलचा अतिरेकी आणि अविचारी वापर टाळायला हवा. याला पर्याय म्हणजे थेट डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Paracetamol Side Effect : पॅरॅसिटॅमॉलच्या अधिक सेवनाचे होतात गंभीर परिणाम, जाणून घ्या धोके
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement