त्वचा काचेसारखी चमकदार दिसेल, महागड्या ट्रिटमेंट कशाला, घरीच तयार करा खास पॅक!

Last Updated:

Skin Care: हिवाळा असो, पावसाळा असो किंवा उन्हाळा, त्वचेची काळजी घ्यायलाच हवी. सूर्याच्या किरणांपासून त्वचेचं रक्षण करणं आवश्यक असतं. घरच्या घरी नेमकी काय काळजी घ्यायची जाणून घेऊया. (हिना आझमी, प्रतिनिधी / देहरादून)

त्वचेची काळजी नेमकी घ्यावी कशी?
त्वचेची काळजी नेमकी घ्यावी कशी?
हिना आझमी, प्रतिनिधी
देहरादून : शरीराला उन्हाची प्रचंड आवश्यकता असते. परंतु त्वचेवर ऊन पडताच ती काळवंडायला सुरुवात होते. त्वचेवर पडलेले काळे डाग सौंदर्यात अडथळे बनू शकतात. त्यामुळे उन्हात घराबाहेर पडण्यापूर्वी व्यवस्थित सनस्क्रीन लावावं. आपल्या त्वचेसाठी कोणतं सनस्क्रीन योग्य आहे याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांकडून घ्यावी. आयुर्वेदिक डॉक्टर सिराज सिद्दीकी यांनी ही माहिती दिली आहे.
advertisement
डॉक्टरांनी सांगितलं की, 1 काकडी सोलून, स्वच्छ धुवून घ्यावी. काकडीचे तुकडे करून ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. मग त्यात ताजं दही मिसळून काळवंडलेल्या त्वचेवर लावावं. 15 मिनिटांनी धुवून घ्यावं. त्यामुळे काळे डाग हळूहळू निघून जातील.
लिंबूसुद्धा त्वचेसाठी अतिशय गुणकारी असतो. लिंबात असलेल्या ऍसिडमुळे सूर्याच्या प्रखर किरणांपासून काळवंडलेली आपली त्वचा उजळते. लिंबू आणि पपईच्या फेसपॅकचा वापर केला तर उत्तमच. त्यासाठी 4 चमचे पपईचा गर घेऊन त्यात लिंबू पिळून छोटा चमचाभर मध घालावं. मिश्रण एकजीव करून छान पॅक बनवून घ्यावा. चेहऱ्यावर हा पॅक लावून 20 मिनिटं तसाच ठेवावा. नंतर स्वच्छ पाण्यानं चेहरा धुवून घ्यावा. यामुळे टॅनिंग हळूहळू दूर होतं.
advertisement
डॉक्टरांनी सांगितलं की, टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट आणि लायकोपिन भरभरून असतं, ज्यामुळे त्वचा छान उजळते. त्यासाठी टोमॅटोचा गर स्मॅश करून त्यात 2 चमचे दही घालावं. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून अर्ध्या तासानं धुवून घ्यावं. यामुळे त्वचेवर सूर्याच्या उन्हामुळे जमलेला काळपट थर निघून जातो आणि त्वचेचा खरा रंग टवटवीतपणे दिसतो. अशा काही घरगुती उपायांनी आपण चेहऱ्यावरील तेज टिकवून ठेवू शकता, असं डॉक्टरांनी सांगितलं.
advertisement
(सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
त्वचा काचेसारखी चमकदार दिसेल, महागड्या ट्रिटमेंट कशाला, घरीच तयार करा खास पॅक!
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement