आहारात जास्त मीठ खाताय ? वेळीच व्हा सावध, हे त्वचेचे आजार सोडणार नाहीत साथ
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
आहारात जास्त मीठ घेतल्यास त्वचेला हानी पोहचते. हिवाळ्यात आधीच हवामान कोरडे असल्याने त्वचेला इजा होते. मीठ जास्त प्रमाणात आहारात घेतल्यास ही समस्या अधिक वाढू शकते.
अमरावती : हिवाळ्याच्या दिवसांत थंडीमुळे अनेकांना तहान कमी लागते. याच काळात लोणची, पापड, चटपटीत पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. त्यात मीठ जास्त प्रमाणात असते. पण, आहारात जास्त मीठ घेतल्यास त्वचेला हानी पोहोचते. हिवाळ्यात आधीच हवामान कोरडे असल्याने त्वचेला इजा होते. मीठ जास्त प्रमाणात आहारात घेतल्यास ही समस्या अधिक वाढू शकते. आहारात मीठ जास्त घेतल्यास त्वचेच्या कोणत्या समस्या उद्भवतात जाणून घेऊया.
तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात आहारात जास्त मीठ घेतल्यास पुढील समस्या उद्भवू शकतात.
1. सर्वात पहिली समस्या म्हणजे त्वचा कोरडी पडते. जास्त मीठामुळे शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे त्वचा रूक्ष होते आणि ताणल्यासारखी वाटते.
2. तसेच त्वचेला खाज येऊन जळजळ होते. कोरड्या त्वचेमुळे सतत खाज येणे, जळजळ होणे अशा तक्रारी वाढतात.
3. चेहऱ्यावर सूज येणे ही समस्या देखील उद्भवू शकते. विशेषतः सकाळी उठल्यानंतर डोळ्यांभोवती व चेहऱ्यावर सूज दिसून येते.
advertisement
4. चेहऱ्यावरील पिंपल्स वाढणे. शरीरातील दाह वाढल्यामुळे काही लोकांमध्ये पिंपल्सची समस्या वाढते.
5. त्वचा निस्तेज होते. पाण्याअभावी त्वचेची चमक कमी होते आणि त्वचा थकलेली दिसते.
6. अकाली सुरकुत्या येतात. दीर्घकाळ कोरडेपणा राहिल्यास त्वचेचे वृद्धत्व लवकर दिसू शकते.
हिवाळ्यात हवेत ओलावा कमी असतो. त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक आर्द्रता कमी होते. अशा वेळी जर आहारात जास्त मीठ असेल तर शरीरातील पाण्याची कमतरता अधिक जाणवते आणि त्वचेच्या समस्या दुपटीने वाढतात. आहार तज्ञांच्या मते, हिवाळ्यात मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. दररोज पुरेसे पाणी पिणे, घरचे ताजे अन्न खाणे आणि पॅकेज्ड पदार्थ टाळणे महत्त्वाचे आहे.
advertisement
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?
1. रोज गरजेपुरतेच मीठ वापरावे.
2. तहान लागत नसली तरीही पाणी पित राहावे.
3. लोणची, चिप्स, वेफर्स, इन्स्टंट पदार्थ कमी खावेत.
4. फळे, भाज्या, सूप, वरण यांसारखे हलके आणि पाणीदार पदार्थ घ्यावेत.
5. त्वचेसाठी योग्य मॉइश्चरायझरचा वापर करावा.
या सर्व बाबी लक्षात घेतल्या तर त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होईल.
view commentsLocation :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
December 16, 2025 3:16 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
आहारात जास्त मीठ खाताय ? वेळीच व्हा सावध, हे त्वचेचे आजार सोडणार नाहीत साथ










