Tanning : टॅनिंग काढण्यासाठी दही पॅक, चेहऱ्यासाठी सुरक्षित उपाय
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
दुधापासून बनवलेल्या सर्व उत्पादनांमधे लॅक्टिक एसिड असतं. म्हणूनच चेहऱ्यावर थंड दूध किंवा साय लावली तर त्वचेला हायड्रेशन आणि ग्लो मिळतो. चेहऱ्यावर काही लावण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा. दही हा एक सुरक्षित पर्याय आहे. दही लावल्यानं चेहऱ्यावर तात्पुरती चमक येऊ शकते कारण त्यात लॅक्टिक एसिड असतं.
मुंबई : नेहमीच्या वातावरणापेक्षा कोणत्या वेगळ्या वातावरणात गेल्यानं अनेकदा त्वचा टॅन होते. टॅनिंगमुळे त्वचेवर काळेपणा येतो आणि चेहऱ्यावर धूळ जमा झाल्यासारखं वाटतं. हे टॅनिंग कमी करण्यासाठी घरगुती उपाय वापरून पाहा. यातला एक उपाय म्हणजे दही पॅक.
दुधापासून बनवलेल्या सर्व उत्पादनांमधे लॅक्टिक एसिड असतं. म्हणूनच चेहऱ्यावर थंड दूध किंवा साय लावली तर त्वचेला हायड्रेशन आणि ग्लो मिळतो. चेहऱ्यावर काही लावण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा. त्वचा तेलकट असेल तर सायीमुळे मुरुमं येऊ शकतात.
advertisement
दही हा एक सुरक्षित पर्याय आहे. दही लावल्यानं चेहऱ्यावर तात्पुरती चमक येऊ शकते कारण त्यात लॅक्टिक एसिड असतं. लॅक्टिक एसिड हे अल्फा हायड्रॉक्सी एसिड आहे. मृत त्वचा काढून त्वचेला हायड्रेट करणं यामुळे शक्य होतं. मृत त्वचेच्या पेशी काढून टाकल्यानंतर, चेहऱ्यावर चमकणारी त्वचा दिसून येते आणि टॅनिंग कमी होऊ लागतं.
टॅनिंग कमी करण्यासाठी या टिप्सचा करा वापर -
advertisement
सन टॅन कमी करण्यासाठी, दररोज चेहऱ्यावर कोरफड लावू शकता. कोरफड जेल त्वचेची जळजळ कमी करते, मृत त्वचा काढून टाकते आणि त्वचेला आरामदायी परिणाम देखील देते. विशेषतः सनबर्न कमी करण्यासाठी कोरफड फायदेशीर आहे.
बेसन, हळद आणि दुधापासून बनवलेला फेस पॅक देखील टॅनिंग दूर करण्यासाठी प्रभावी आहे. या फेस पॅकमुळे चेहऱ्याला चमक येते.
advertisement
टोमॅटोच्या रसात टॅनिंग दूर करण्याचे गुणधर्म भरपूर असतात. टॅनिंग दूर करण्यासाठी, चेहऱ्यावर टोमॅटो घासू शकता, त्याचा गर लावू शकता किंवा टोमॅटोचा रस देखील चेहऱ्याला चमक देण्यासाठी प्रभावी आहे.
पपई आणि मध मिसळून चेहऱ्यावर लावल्यानं देखील टॅनिंग कमी होतं. हा उपाय केवळ चेहऱ्यावरच नाही तर हात, पाय आणि शरीराच्या इतर भागांवरही वापरता येतो.
advertisement
बटाट्याचा रस चेहऱ्यावरही लावता येतो. बटाट्यात ब्लीचिंग गुणधर्म असतात ज्यामुळे ते त्वचा स्वच्छ करण्याचं काम करतात. यामुळे टॅनिंग आणि डाग कमी होतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 08, 2025 6:30 PM IST


