advertisement

Joint Pain : सांधेदुखीवर रामबाण आयुर्वेदिक उपाय, औषधांबरोबर याचाही करा वापर

Last Updated:

सांधेदुखीपासून आराम मिळवण्याचा एक साधा, सोपा उपाय आहे. यासाठी घरी एक पोटली किंवा पुरचुंडी तयार करून शेकू शकता. यासाठी काही घरगुती मसाले आणि औषधी वनस्पतींचा वापर करायचा आहे. यामुळे वेदना, सूज आणि ताठरपणा कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारचं रसायन नसतं, त्यामुळे त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

News18
News18
मुंबई: लहान मुलांना सर्दी खोकला झाला की, मऊ कापडात ओव्यानं थोडा गरम करून शेकला जातो. असाच एक उपाय मोठ्यांसाठीही उपयुक्त आहे. काहींना अगदी लहान वयातही, सांधेदुखी, ताठरपणा किंवा सूज येण्याचा त्रास होतो. यामागचं मुख्य कारण म्हणजे शारीरिक हालचालींचा अभाव. अशी समस्या उद्भवली तर, वारंवार वेदनाशामक औषधं घेतली जातात.
advertisement
कालांतरानं ही औषधं समस्या आणखी वाढवू शकतात. अशा वेळी, सांधेदुखीपासून आराम मिळवण्याचा एक साधा, सोपा उपाय आहे.
यासाठी घरी एक पोटली किंवा पुरचुंडी तयार करून शेकू शकता. यासाठी काही घरगुती मसाले आणि औषधी वनस्पतींचा वापर करायचा आहे. यामुळे वेदना, सूज आणि ताठरपणा कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारचं रसायन नसतं, त्यामुळे त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
advertisement
साहित्य -
दोन टेबलस्पून ओवा, एक टेबलस्पून मेथी, एक टेबलस्पून बडीशेप, एक टेबलस्पून लसूण पाकळ्या, एक टेबलस्पून हळद, बेस ऑइलसाठी एरंडेल तेल, निर्गुंडी तेल किंवा धन्वंतरम थैलम आवश्यक आहे.
सर्वप्रथम, हे सर्व कोरडं साहित्य सुगंध येईपर्यंत थोडं भाजून घ्या. स्वच्छ कापसाच्या किंवा मलमलच्या कापडात बांधा. एका तव्यात तेल गरम करा आणि त्यात ही पुरचुंडी थोडी बुडवा. तेल न वापरताही, तव्यावर गरम करता येईल. खूप गरम करु नका, गुडघे, कोपर, बोटं किंवा कोणत्याही वेदनादायक सांध्यावर गोल फिरवत मसाज करा.
advertisement
दिवसातून एकदा, शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करा. यामुळे सांध्यातील सूज कमी होते, रक्ताभिसरण सुधारतं आणि हळूहळू वेदना आणि ताठरपणा कमी होतो. हा उपाय नियमितपणे 7-10 दिवस केला तर फरक जाणवेल. यामुळे केवळ वेदनांपासून आराम मिळतोच, शिवाय सांधे दीर्घकाळ निरोगी राहण्यासही मदत होते.
advertisement
ओवा आणि मेथीत दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे सूज कमी करतात. हळद आणि लसूण वेदना कमी करतात आणि रक्त प्रवाह सुधारतात. तर, सैंधव मीठामुळे स्नायूंना आराम मिळतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Joint Pain : सांधेदुखीवर रामबाण आयुर्वेदिक उपाय, औषधांबरोबर याचाही करा वापर
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement