Heart Health : हृदयाच्या आरोग्यासाठी पाच टिप्स, हृदयाला देतील संजीवनी

Last Updated:

हृदयविकारापासून बचाव करण्याचे पाच सोपे मार्ग यासाठी उपयुक्त ठरतील. यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहिल. या महत्त्वाच्या टिप्स हृदयाला नवीन शक्ती देणाऱ्या ठरतील.

News18
News18
मुंबई : पूर्वी केवळ वृद्धांना जाणवणारा हृदयरोग सध्या तरुणांमधेही दिसून येतो आहे. काही सोप्या आणि प्रभावी सवयींनी हृदय दीर्घकाळ निरोगी आणि सक्रिय ठेवू शकतो.
हृदयविकारापासून बचाव करण्याचे पाच सोपे मार्ग यासाठी उपयुक्त ठरतील. यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहिल. या महत्त्वाच्या टिप्स हृदयाला नवीन शक्ती देणाऱ्या ठरतील.
दररोज चालणं किंवा व्यायाम करणं - शरीर सक्रिय ठेवणं हृदयासाठी सर्वात महत्वाचं आहे. दररोज किमान 30 मिनिटं चालणं. योगा, स्ट्रेचिंग किंवा सायकलिंगसारखे हलके व्यायाम देखील फायदेशीर आहेत. यामुळे रक्ताभिसरण चांगलं राहतं आणि हृदय मजबूत होतं.
advertisement
- निरोगी आहार घ्या - आपल्या आहारावर हृदयाचं आरोग्य ठरतं. त्यामुळे हिरव्या भाज्या, फळं, ओट्स, काजू आणि फायबरयुक्त पदार्थ खा. तळलेले, जास्त मीठ आणि साखरेचे पदार्थ टाळा. ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असलेले पदार्थ मासे, जवस हृदयासाठी खूप चांगले असतात.
advertisement
- ताणतणावापासून दूर राहा
ताण व्यवस्थापन प्रकृतीसाठी खूप महत्त्वाचं आहे. जास्त ताणतणावाचा हृदयावर वाईट परिणाम होतो. दररोज थोडा वेळ ध्यान करणं किंवा दीर्घ श्वसनाचा सराव करा. सकारात्मक विचार करा आणि छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेऊ नका. चांगली झोप घ्या, कारण झोपेच्या अभावामुळेही हृदयरोग होऊ शकतो.
advertisement
- धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहा.
धूम्रपान आणि जास्त प्रमाणात मद्यपान करणं हृदयासाठी खूप हानिकारक आहे. धूम्रपान करत असाल तर ती सवय सोडण्याचा प्रयत्न करा. मद्यपान मर्यादित प्रमाणात करा किंवा पूर्णपणे बंद करा. यामुळे हृदयाच्या धमन्या स्वच्छ राहतात आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
- नियमित आरोग्य तपासणी करा.
कधीकधी हृदयरोग कोणत्याही लक्षणांशिवाय होऊ शकतो. वर्षातून एकदा रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि साखरेची तपासणी करा. कुटुंबात हृदयरोगाचा त्रास कोणाला असेल तर आणखी सावधगिरी बाळगा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी ईसीजी किंवा इतर चाचण्या करून घेणं फायदेशीर ठरतं.
advertisement
हृदयाचं आरोग्य आपल्या हातात आहे. या पाच सोप्या सवयींमुळे हृदयविकाराचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Heart Health : हृदयाच्या आरोग्यासाठी पाच टिप्स, हृदयाला देतील संजीवनी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement