Vitamin E : थकवा येत असेल तर दुर्लक्ष करु नका, जीवनसत्वांची कमतरता असू शकतं कारण
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
स्नायूंचं कार्य बिघडल्यानं दैनंदिन कामांत व्यत्यय येऊ शकतो. याला सामान्य थकवा समजतात, पण हे व्हिटॅमिन ईच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. व्हिटॅमिन ई त्वचा आणि केसांबरोबरच डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील खूप महत्वाचं आहे.
मुंबई : व्हिटॅमिन ई म्हणजे त्वचा किंवा केसांचं आरोग्य असं समीकरण असतं. व्हिटॅमिन ई हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, यामुळे शरीराच्या पेशींचं नुकसान होण्यापासून संरक्षण होतं. याच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक शारीरिक समस्या आणि आजार वाढू शकतात, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होऊ शकतं. व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं.
यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, व्हिटॅमिन ईच्या कमतरतेचा शरीराच्या न्यूरोमस्क्युलर सिस्टमवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे स्नायू कमकुवत आणि थकल्यासारखे वाटू लागतात. या स्थितीत, साधी कामं देखील थकवणारी वाटतात.
स्नायूंचं कार्य बिघडल्यानं दैनंदिन कामांत व्यत्यय येऊ शकतो. याला सामान्य थकवा समजतात, पण हे व्हिटॅमिन ईच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. व्हिटॅमिन ई त्वचा आणि केसांबरोबरच डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील खूप महत्वाचं आहे. यामुळे डोळ्यांचं ऑक्सिडेटिव्ह नुकसान रोखता येतं. त्याच्या कमतरतेमुळे दृष्टी कमकुवत होते आणि वयानुसार ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. दृष्टी अंधुक किंवा कमजोर वाटत असतील, तर हे व्हिटॅमिन ईच्या कमतरतेचे लक्षण असू शकतं, ज्याकडे दुर्लक्ष करू नये.
advertisement
व्हिटॅमिन ई मुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. वारंवार सर्दी, खोकला किंवा इतर विषाणूजन्य संसर्ग होत असतील तर ते व्हिटॅमिन ई च्या कमतरतेमुळे असू शकतं. हे व्हिटॅमिन शरीराच्या रोगप्रतिकारक पेशींची कार्यक्षमता वाढते, ज्यामुळे शरीर रोगांशी लढण्यास सक्षम होते.
याशिवाय, व्हिटॅमिन ईचा परिणाम आपल्या त्वचेवर देखील दिसून येतो. त्वचेची आर्द्रता आणि संरक्षणासाठी हे महत्त्वाचं आहे. कमतरतेमुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी होऊ शकते, ज्यामुळे सुरकुत्या लवकर दिसू लागतात. याशिवाय त्वचेवर अकाली वृद्धत्वाची लक्षणं दिसतात. त्वचेच्या आरोग्यासाठी शरीरात या जीवनसत्वाचं योग्य प्रमाण राखणं खूप महत्वाचं आहे.
advertisement
व्हिटॅमिन ई रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. शरीरात व्हिटॅमिन ईची कमतरता असेल तर केस कमकुवत आणि निर्जीव होऊ शकतात आणि केस गळणं देखील वाढू शकतं.
जर तुमचे केस गळत असतील किंवा केस असामान्यपणे तुटत असतील तर ते व्हिटॅमिन ईच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 06, 2025 8:45 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Vitamin E : थकवा येत असेल तर दुर्लक्ष करु नका, जीवनसत्वांची कमतरता असू शकतं कारण


